भाईजानच्या ‘त्या’ फोटोवर चाहते फिदा; एक्स गर्लफ्रेंडनेही केली कमेंट, लग्न करा..

भाईजानच्या ‘त्या’ फोटोवर चाहते फिदा; एक्स गर्लफ्रेंडनेही केली कमेंट, लग्न करा..

Salman Khan Photo: बॉलिवूड अभिनेता भाईजान सलमान खान (Salman Khan Photo) त्याचे नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. यावर चाहते देखील भरभरून प्रतिक्रिया देत असतात. (Salman Khan) अलीकडेच त्याने आपला एक हसतानाचा एक फोटो शेअर केला. (Photo Share) तसेच त्याच्या लग्नाच्या चर्चां देखील अधून मधून होत असतात. ५७व्या वर्षीही अविवाहित असलेल्या भाईजानच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींशी भाईजानचे प्रेमसंबंध होते. मिस युनिव्हर्सचा किताब नावावर केलेल्या संगीता बिजलानीसोबत भाईजान रिलेशनशिपमध्ये होता. सलमान खानने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान काळ्या रंगाचं टी- शर्टमध्ये मस्त हसताना दिसत आहे. त्याचा हा फोटो बघून संगीता बिजलानीला कमेंट करण्याचा मोह आवरता आला नाही. भाईजानची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या संगीताने त्याच्या त्या फोटोवर “हे” अशी कमेंट केली आहे. सलमानच्या त्या फोटोवर संगीताची कमेंट बघून चाहतेही भाईजानच्या फोटोला मोर्च्या प्रमाणात कॉमेंट्स करत आहेत.

संगीता बिजलानीच्या कमेंटनंतर चाहत्यांनी भाईजानच्या त्या फोटोवर कमेंट्चा चांगलाच वर्षाव केला आहे. अनेकांनी संगीताच्या कमेंटवर रिप्लाय करत ‘वहिनी’ असं कॉमेंट्स केले आहे. तर एकाने “भाईजान तुला अजूनही आवडतो का?” “लग्नाची तयारी” असं एकाने म्हटलं आहे. तुम्ही अजूनपर्यंत वाट पाहत होतात, असं वाटतंय” असंही एकाने म्हटलं आहे. “लग्न करुन टाका” अशीही कमेंट केली आहे. तुम्ही दोघं एकत्र छान दिसता, पहिल प्रेम” असंही अनेक कॉमेंट्स त्या फोटोला चाहते करत आहेत.

न्यायालयाचा दिलासा! चुंबन प्रकरणी शिल्पा शेट्टीला जुनाच आदेश कायम 

सलमान खान व संगीता बिजलानी अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. परंतु काही कारणाने त्या दोघांचे लग्न झाले नाही. यानंतर संगीताने १९९६ साली मोहमद्द अजरुद्दीनसोबत लग्नगाठ बांधली. २०१९मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले आहे. सलमान आणि संगीता आजही चांगले मित्र आहेत. संगीता बिजलानीच्या वाढदिवशी सलमानला तिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्या दोघांच्या नात्याविषयी चर्चा रंगत होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube