दिवेआगर समुद्रकिनारी बुडालेल्या 8 मृत विद्यार्थ्यांची नावे समोर
Diveagar Sea Accident 8 Students: रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीच्या विनर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवर काळाने घाला घातला.
Diveagar Sea Accident 8 Students: रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीच्या विनर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवर काळाने घाला घातला. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या आठ 16 वर्षीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मृत विद्यार्थ्यांची नावे समोर आली असून, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे आळंदी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या सहलीत अकॅडमीचे 25 मुले, 17 मुली आणि 6 शिक्षक असे एकूण 48 जण सहभागी झाले होते. त्यापैकी आठ विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली. बचावकार्यादरम्यान आठही विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे
1. तन्मय दत्तात्रय वहीले
2. सुमित भरत अहिरे
3. प्रणव रामदास बनसोडे
4. कैवल्य सतीश वासनकर
5. राजवीर युवराज वहीले
6. यश किरण वानखेडे
7. सोहम तुकाराम भांडवलकर
8. कौस्तुभ संदीप दौंड
मृत्यू झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे वय 16 वर्षे असून ते आळंदी, पुणे येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आळंदी परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुर्घटनेची नेमकी परिस्थिती आणि इतर तपशीलाबाबत संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.