ठाकरेंशी जमेना, कोकणातील बड्या नेत्याचा जय महाराष्ट्र; अजितदादांनी मिळवला 16 वा माजी आमदार

Maharashtra Politics : राज्यातील विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाल्यापासून महाविकास आघाडी जर्जर झाली आहे. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. या निवडणुकीची (Maharashtra Politics) तयारी सुरू झाली आहे. मात्र आघाडीतील गळती काही थांबलेली नाही. आताही आणखी एक नवा धक्का उद्धव ठाकरेंना कोकणात (Uddhav Thackeray) बसला आहे. आणखी एका शिलेदाराने ठाकरेंना जय महाराष्ट्र करत अजितदादांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी उबाठाचे रायगड संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर, श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती बाबुराव चोरगे, कारीवणे गावच्या सरपंच गीता चोरगे, जगन्नाथ चाळके, गणेश निर्मळ, बबन जोशी, मालती पवार, जागृती चाळके, रोशन मोरे यांच्यासह मराठा, कुणबी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.
Video : “दैनंदिन जीवनात हिंदीचा जास्त वापर होतो”, मंत्री दादा भुसेंच्या वक्तव्याने वादाची ठिणगी
प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे अशा शब्दांत खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर प्रवेशाबद्दल मत व्यक्त केले. १९९५ पासून श्रीवर्धन शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला होता. त्यावेळी राजकीय संघर्ष होता पण कोणताही मनभेद नव्हता. मी जेव्हा या मतदारसंघात निवडून आलो त्यानंतर परिवर्तन घडून आले. तुमची पक्षाशी निष्ठा राहिली म्हणून मला तिथे कमी मतदान मिळाले अशी कबुलीही सुनील तटकरे यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आमदार इद्रीस नायकवडी, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी,सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, सुभाष केकाणे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक; काँग्रेस नेत्याचा भाजपवर हल्लाबोल…