Download App

Salman Khanच्या सेटवर मुलींच्या कपड्यांसाठी अनोखा नियम; पलक तिवारीचा मोठा खुलासा

Palak Tiwari On Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक तिवारी (Palak Tiwari) देखील चाहत्यांना घायाळ करणार आहे.

चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पलकने भाईजानसोबत काम करण्याचा तिला आलेला अनुभव सांगितला आहे. तर यावेळी पलकनं मोठा खुलासा देखील केला आहे. भाईजानच्या सेटवर मुलींना त्यांच्या कपड्यांवरून काही नियम असतात. सेटवर मुली रिव्हिलींग कपडे घालू शकत नाही.

तसेच पलकनं सिद्धार्थ कन्नन या युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, सिनेमामध्ये काम करण्याचा त्याचा अनुभव सांगितला. ‘मी भाईजानच्या अंतिम या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर होते. मला वाटलं अनेकांना ही गोष्ट माहित नसेल पण, सलमान सरांच्या सेटवर मुलींसाठी एक नियम असतो, तो म्हणजे माझ्यासेटवर मुलींची नेकलाइन इथं पर्यंत असली पाहिजे. मुलीचे शरीर हे झाकलेलं हवं.


यामुळे जेव्हा माझ्या आईने मला शर्ट आणि जॉगरमध्ये सेटवर जाताना बघितले, ज्यामध्ये मी माझं शरीर हे झाकलेलं होतं. तेव्हा तिनं मला विचारलं की कुठे जात आहेस? पुढे याविषयी आईला सांगत पलक म्हणाली, ‘भाईजानच्या सेटवर जात आहे. माझ्या आईला आनंद झाला. त्यावर तिनं मला पुढे एक सवाल केला की,असा नियम का? तेव्हा मी सांगितले की ते ट्रेडिशन्ल आहे. ते म्हणतात तुम्हाला जसे कपडे परिधान करायचे आहेत तसे करा. पण त्याबरोबर काम करत असलेल्या मुली सुरक्षित रहायला हव्या असं त्यांना वाटतं.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

आपल्या आजुबाजूला असलेल्या व्यक्तींना आपण पर्सनली ओळखत नसतो, यामुळे ती जागा ही पर्सनल स्पेस नसते आणि तिथे या सगळ्यांवर विश्वास ठेवू शकत नसतो. यामुळे स्त्रीया सुरक्षित असायला हव्या म्हणून त्यांनी हा नियम काढला असल्याचे तिने यावेळी सांगितले. पुढे पलकनं तिच्या आईला जेव्हा कळलं की तिला भाईजानच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा तिला काय वाटलं होतं.


‘माझी आई खूप शांत होती. कारण तिला माहित होतं की मी भाईजानच्या सेटवर जाणार आहे. कारण प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलीने कसे कपडे घालायला हवे. प्रत्येक आईप्रमाणे माझीही आई तशीच आहे. दरम्यान, भाईजानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदच्या निमित्ताने 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भाईजानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, दाक्षिणात्य सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि राघव जुयाल यांची महत्त्वाच्या भूमिका आहे.

Tags

follow us