Download App

Farrey Film Screening: ‘फर्रे’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला ‘या’ सेलिब्रेटींनी लावली हजेरी

Farrey Film Screening: सलमान खानची (Salman Khan) भाची अलिजेह अग्निहोत्री (Alizeh Agnihotri) तिच्या आगामी चित्रपट ‘फरे’च्या (Farrey Movie) रिलीजच्या तयारीत आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. (Film Screening) यादरम्यान ‘फॅरे’ची संपूर्ण कलाकार टीम हटक्या अंदाजात बघायला मिळाले आहे. यामध्ये अलिझेहसोबत अभिनेत्री प्रसन्ना बिश्त, साहिल मेहता आणि जेन शॉ स्टेजवर हजेरी लावली.

विशेष स्क्रीनिंगच्या वेळेस सलमानने भाची अलिजेहासोबत खास आनंदजात दिसला आहे. अलिजेसोबतच नाही तर भाईजानही ​​पापाराझीसोबत मस्ती करताना दिसला आहे. सलमान खानच्या भाचीच्या फर्रे चित्रपटाच्या स्क्रिनिंगला कतरिना कैफही हजेरी लावली होती. रेड कलरच्या वन साइड शोल्डर ड्रेसमध्ये कतरिना कैफ स्टाइल दाखवताना दिसली. कतरिनाच्या या सिझलिंग लूकने चांगलीच लाइमलाइट मिळवली आहे.


कियारा अडवाणीनेही फॅरेच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. फिल्म स्क्रिनिंगमध्ये कियाराने ब्रँडेड ब्लू कलरचा टर्टल नेक टॉप घातलेला दिसला होता.गौरी खान देखील चित्रपटाच्या स्क्रीनिंगचा एक भाग बनली होती. स्क्रिनिंगमध्ये गौरी खानने काळ्या शॉर्ट टॉप आणि पँटसह पिवळा कोट मध्ये बघायला मिळाली आहे.

‘Tiger 3’ चा दिवाळीत धमाका; मिळालेल्या प्रतिसादाबद्दल भाईजानने मानले चाहत्यांचे आभार

पूजा हेगडी अलिझेह अग्निहोत्रीच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा एक स्टायलिश बेबी पिंक कलरचा ड्रेसमध्ये हटक्या अंदाजात दिसत होती. अभिनेता रणदीप हुड्डा त्याच्या मैत्रिणीसोबत सलमान खानच्या भाचीच्या फरे या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित होता. रणदीप हुड्डा पांढर्‍या शर्टसह क्रीम कोट आणि काळी पँट घातलेला दिसला. अभिनेत्याची मैत्रीण बर्‍याच फ्रिल्स असलेल्या ड्रेसमध्ये स्टाईल दाखवताना दिसली. रवीना टंडनची मुलगी राशा टंडननेही अलीझेह अग्निहोत्रीच्या फरे या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. या चित्रपटाची निर्मिती फरे सलमान खान प्रॉडक्शनने केली आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us