‘Tiger 3’ चा दिवाळीत धमाका; मिळालेल्या प्रतिसादाबद्दल भाईजानने मानले चाहत्यांचे आभार

‘Tiger 3’ चा दिवाळीत धमाका; मिळालेल्या प्रतिसादाबद्दल भाईजानने मानले चाहत्यांचे आभार

Tiger 3 : सलमान खान (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका कतरिना कैफ यांच्या टायगर 3 ची उत्सुकता शिगेला पोहचली होती. टायगर 3 (Tiger 3) निमित्ताने सलमान- कतरिना (Katrina Kaif) यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली आहे. (box office) ‘टायगर 3’ सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सलमान खानने चाहत्यांचे आभार मानले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


‘टायगर 3’ हा असा पहिला हिंदी सिनेमा आहे, जो शुक्रवार ऐवजी रविवारी प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे सिनेमाच्या रिलीजआधीपासुनच एक क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळत होती. टायगर 3 निमित्ताने सलमान – कतरिना दिवाळीमध्ये बॉक्स ऑफीस धमाका मोठा धमाका केला आहेत.

टायगर 3 विषयी सलमान म्हणतो, एवढा मोठा सुपरहिट ठरला यावर विश्वास बसलेला नाही “सिनेमा दिवाळीत रिलीज होणे हे नेहमीच खास ठरले आहे, कारण या सणाने मला नेहमीच गुडलक दिलं आहे. दिवाळीच्या खूप गोड आठवणी आहेत. हे खूपच आश्चर्यकारक आहे की कतरिना आणि माझा टायगर 3 हा पहिला दिवाळी चित्रपट असेल! सहकलाकार म्हणून आम्ही असे चित्रपट केले आहेत जे अनेकांना आवडले आहेत. त्यामुळे, आम्ही त्यांना टायगर 3 सह सर्वोत्तम दिवाळी देऊ शकलो आहे, त्यामुळे खूप आनंद झाला आहे.

दिवाळीमध्ये सिनेमागृहात या सिनेमाचा चांगलाच बोलबाला होता. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून या सिनेमाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी मात्र या सिनेमाच्या कमाईमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली आहे.

Jau Bai Gavat: करणार तेव्हा कळणार! ‘जाऊ बाई गावात’ 6 स्पर्धकांची नाव जाहीर

आदित्य चोप्रा निर्मित आणि मनीश शर्मा दिग्दर्शित, टायगर 3 या रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज करण्यात आला आहे. टायगर 3 मध्ये सलमान खान, कतरिना कैफ, इमरान हाश्मी हे कलाकार मुख्य भुमिकेत बघायला मिळाले आहेत. सलमान – कतरिना पुन्हा एकदा टायगर – झोयाच्या भुमिकेत पाहायला मिळाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube