Box office collection: भाईजानच्या ‘टायगर 3’ने मोडला किंग खानच्या ‘जवान’चा रेकॉर्ड

Tiger 3 Box office collection: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) , अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत असलेला ‘टायगर 3’ हा सिनेमा 12 नोव्हेंबर दिवशी दिवाळीच्या मूहुर्तावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाने आता बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी टायगर 3ने किती […]

Box office collection: भाईजानच्या 'टायगर 3'ने मोडला किंग खानच्या 'जवान'चा रेकॉर्ड

Box office collection: भाईजानच्या 'टायगर 3'ने मोडला किंग खानच्या 'जवान'चा रेकॉर्ड

Tiger 3 Box office collection: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) , अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत असलेला ‘टायगर 3’ हा सिनेमा 12 नोव्हेंबर दिवशी दिवाळीच्या मूहुर्तावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाने आता बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी टायगर 3ने किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी टायगर 3 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 57.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेतील आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने 45.5 कोटी रुपयांची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 57.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दोन दिवसामध्ये सिनेमाने एकूण 102 कोटी रुपयांची कमाई केली आहे. टायगर 3 हा सिनेमा प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी जास्त कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे.

पठाणने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 70.50 कोटी रुपयांचा गल्ला कमावला होता. त्यानंतर टायगर 3 सिनेमाने 57.50 कोटी रुपयांची कमाई दुसऱ्या दिवशी केली आहे. जवान सिनेमाने दुसऱ्या दिवशी 53 कोटी रुपयांचा गल्ला कमावला होता. गदर 2 सिनेमाने 43.8 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर भाईजानच्या टायगर 3ने किंग खानच्या जवान सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे.

Namrata Sambherao: नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा खास! नवऱ्यासोबत झळकणार ‘या’ सिनेमात

तसेच अडवान्स बुकींगच्या हिशोबाने टायगर 3 सिनेमा तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिनेमाने दुसऱ्या दिवशी अडवान्स बुकींगच्या माध्यमातून 17.48 कोटी रुपयांची मोठी कमाई केली होती. याअगोदर जवान सिनेमाने दुसऱ्या दिवशी अडवान्स बुकींगच्या माध्यमातून 21.62 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या क्रमांकावर पठाण हा सिनेमा आहे. या सिनेमाने 32.10 कोटी रुपयांचा गल्ला कमावला होता.

Exit mobile version