Namrata Sambherao: नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा खास! नवऱ्यासोबत झळकणार ‘या’ सिनेमात
Namrata Sambherao Husband New Movie: दिवाळी पाडवा जवळ आली की, घरच्या नवरे मंडळीत एक अनोखीच चर्चा रंगते ती म्हणजे बायकोला पाडव्याला काय गिफ्ट द्यावं याची. (Marathi Movie) अभिनेत्री नम्रता संभेरावला (Namrata Sambherao) तिच्या नवऱ्याने यंदा भारी गिफ्ट दिलं आहे. यामुळे नम्रता सध्या चांगलीच खुश आहे. तुम्हाला ही याबद्दल उत्सुकता असेलच की, असं काय गिफ्ट आहे की ज्यामुळे नम्रताचा यंदाचा पाडवा विशेष ठरणार आहे.
View this post on Instagram
8 डिसेंबर दिवशी नम्रताचा ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tr Bagha) हा मराठी सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या मराठी सिनेमात योगेश संभेराव म्हणजेच नम्रताचा नवरा एका छोटेखानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता रील लाईफमध्ये हे कपल एकत्र झळकणार असल्याने रिअल टू रील हा प्रवास नम्रताला विशेष आनंद देणारा आहे, यात शंका नाही. 8 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक कृष्ण चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.
अभिनेता असण्याबरोबरच प्रसाद उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील अनेक स्किटचे लेखन तो करत असतो. त्याच्या नवीन सिनेमाचे लेखन देखील त्यानेच केले आहे. प्रसाद खांडेकर लिखित दिग्दर्शित सिनेमा बघायला मिळणार असल्याने चाहते देखील खूश झाले आहेत. ‘कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रोडक्शन्स’ आणि ‘एस आर एन्टरप्रायजर्स’ यांच्या वतीने नुकतीच ७ मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. कॅलिडोस्कोप’चे पारितोष पेंटर आणि ‘एस आर एन्टरप्रायजर्स’चे राजेश कुमार मोहंती हे या सिनेमाचे निर्माते आहेत.
Sam Bahadur : ‘सॅम बहादुर’च्या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा
या सिनेमाचे चित्रीकरण कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात झाली आहे. गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर आदि कलाकार या सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहेत.