Sam Bahadur : ‘सॅम बहादुर’च्या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा

Sam Bahadur : ‘सॅम बहादुर’च्या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा

Sam Bahadur Badhte Chalo Song Release: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. या सिनेमात विकी हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची मुख्य भूमिका साकारताना बघायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसापासून या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. आता सॅम बहादुर या सिनेमामधील ‘बढते चलो’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्याच्या लिरिक्सनं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)


‘बढते चलो’ या गाण्यामध्ये विकी कौशल हा सौनिकांना लढाईसाठी तयार करत असताना दिसत आहे. या गाण्यामध्ये सैनिक हे विविध घोषणा देखील देत असताना दिसत आहे. ‘बढते चलो’ या देशभक्तीपर गाण्यामध्ये सैनिक हे बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय, बजरंगबली की जय, बिरसा मुंडा की जय, राजा रामचंद्र की जय, बोलो हिंदुस्थान की जय, जो बोले सो निहाल सत श्री अकाल अशा घोषणा देत असल्याचे बघायला मिळत आहेत. हे गाणं ऐकून अंगावर शहारे येत आहेत, अशी कमेंट अनेक चाहते या गाण्याला केली आहे.

गाण्यामध्ये सॅम माणेकशॉच्या भूमिकेनमध्ये असणारा विकी कौशल हा आपल्या बटालियनला प्रेरणा देत असल्याचे दिसत आहे. गाण्याच्या सुरुवात होत असताना ऐकू येतं की विकी सैनिकांना म्हणतो की, ‘आपण या दिवसासाठी तयारी केली आहे. ‘बढते चलो’ हे गाणे देशातील लोकांमधील उत्साह आणि देशभक्तीची भावना वाढवत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘बढते चलो’ हे गाणे शंकर महादेवन आणि विशाल ददलानी यांनी गायले आहे. या गाण्यामध्ये शंकर एहसान लॉय यांनी संगीत दिले आहे, आणि गुलजार यांनी हे गाणं लिहिलं आहे. या गाण्याचं सध्या सोशल मीडियावर अनेकजण कौतुक करत असल्याचे दिसत आहेत.

Shreyas Talpade: श्रेयस तळपदेने केली त्याच्या ‘अजाग्रत’ या पॅन इंडिया ब्लॉकबस्टरची घोषणा

सॅम बहादुर हा सिनेमा मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. 1 डिसेंबर 2023 दिवशी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात फातिमा सना शेखनं इंदिरा गांधी यांची मुख्य भूमिका साकारली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube