Download App

Box Office Collection: ‘टायगर 3’च्या कमाईत घट कायम; 8व्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी

Tiger 3 Box Office Collection : सलमान खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजान (Salman Khan), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाशमी (Emraan Hashmi) यांचा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करत असल्याचे बघायला मिळत आहे. वीकेंड असून देखील ‘टायगर 3’ला चाहत्यांचा प्रतिसाद अजिबात मिळाला नाही.

‘टायगर 3’ हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. दिवाळीमध्ये सिनेमागृहात या सिनेमाचा चांगलाच बोलबाला होता. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून या सिनेमाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी मात्र या सिनेमाच्या कमाईमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली आहे.


‘टायगर 3’ हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 दिवशी चाहत्यांचा भेटीला आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ‘टायगर 3’ने 44.5 कोटींचा गल्ला कमावला होत. दुसऱ्या दिवशी 59.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 44.3 कोटी, चौथ्या दिवशी 21.1 कोटी, पाचव्या दिवशी 18.5 कोटी, सहाव्या दिवशी 13.25 कोटी, आणि सातव्या दिवशी 18.5 कोटींची कमाईत घसरण बघायला मिळाली आहे. आणि आठव्या दिवशी देखील भाईजानच्या या सिनेमाच्या कमाईत घसरणचं पाहायला मिळाली. आठव्या दिवशी वीकेंडला या सिनेमाने फक्त 10.25 कोटींचा मोठा गल्ला कमावला आहे. ‘टायगर 3’ या सिनेमाने रिलीजच्या 8 दिवसांत देशात 229.65 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Manushi Chhillar : आजच्याच दिवशी मिळाला ‘मिस वर्ल्ड’ सन्मान; मानुषी छिल्लरचा प्रेरणादायक प्रवास

भाईजानच्या ‘टायगर 3’ या सिनेमाने रिलीजच्या 8 दिवसांत देशात 229.65 कोटींचा गल्ला कमावला आहे. तर जगभरात या सिनेमाने 358 कोटींची मोठी कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 400 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचे बघायला मिळणार आहे. ‘टायगर 3’ हा सिनेमा किंग खानच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडणार का? याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागलं आहे.

या सिनेमात भाईजान सोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेमध्ये आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. तर ‘टायगर 3’ हा सिनेमा यंदा दिवाळीमध्ये 12 नोव्हेंबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे.

Tags

follow us