Bollywood Stars Become Victims Of Kidnapping And Attacks : बॉलिवूड स्टार (Bollywood News) आणि पतौडी घराण्याचा नवाब सैफ अली खानसाठी 16 जानेवारीची रात्र खूप कठीण होती. रात्री उशिरा एका चोराने घरात प्रवेश केला. सैफवर एकामागून एक सहा वेळा चाकूने वार केले. सैफने (Saif Ali Khan) स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो गंभीर जखमी झाला.
सैफ पूर्णपणे ठीक आहे. तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. बॉलिवूड अभिनेत्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सलमान खान, गुलशन कुमार सारख्या अनेक स्टार्सनी यातून मोठा धडा घेतला आहे. गुलशन कुमार यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला. कोणकोणत्या बॉलिवूड अभिनेत्यावर हल्ला यापूर्वी हल्ला झालाय, ते आपण सविस्तर पाहू या.
आजपासून पिंपरी चिंचवड मनपाचा ‘पर्पल जल्लोष’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
सलमान खान
गेल्या अनेक महिन्यांपासून सलमान खानला (Salman Khan) सतत धमक्या दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला टार्गेट केलं जातंय. खरंतर 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान कायदेशीर अडचणींना तोंड देत आहे. या प्रकरणात सैफही सामील होता. 2018 मध्ये पहिल्यांदाच लॉरेन्सने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी सलमानच्या घरावरही गोळ्या झाडण्यात आल्या.
गुलशन कुमार
1997 मध्ये टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, त्यानंतर संपूर्ण बॉलिवूड हादरले. मुंबईतील अंधेरी येथील एका मंदिराजवळ गुलशनवर तीन जणांनी गोळ्या झाडल्या. गुलशनने अंडरवर्ल्डला खंडणीचे पैसे देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
संजय लीला भन्साळी
संजय लीला भन्साळींसाठी 2018 हे वर्ष खूप कठीण होते. संजयचा ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होणार होता, तेव्हा काही लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्ला करणारे लोक राजपूत समुदायाचे होते, असं सांगितलं जातंय. त्यापैकी एकाने कलाकार आणि क्रू मेंबर्ससमोर संजयला थप्पड मारली.
मुझे एक करोड़ चाहिए; सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याने केली मागणी; पोलिसांनी दिली आतली माहिती
संजय दत्त
1993 मध्ये दंगलीच्या वेळी संजय दत्तवर कोणीतरी गोळीबार केला होता, पण तो थोडक्यात बचावला होता. यानंतर, संजयला अनेक वर्षे धमक्या येत राहिल्या. संजयचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे म्हटले जात होते.
रवीना टंडन
काही महिन्यांपूर्वी, रवीना टंडनशी संबंधित लिंचिंगचा एक प्रकारही समोर आला होता. खरंतर, अॅक्ट्रोसचा चालक इमारतीच्या आत गाडी चालवत होता, तेव्हा दोन महिलांनी त्याला थांबवले. तो गाडीने त्यांना धडक देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. आवाज ऐकून रवीना बाहेर आली, त्याच दरम्यान दोन्ही महिला अभिनेत्रीच्या इमारतीत शिरल्या आणि रवीनावर रागाने ओरडू लागल्या. रवीनाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती शांत झाली नाही. नंतर पोलिसांनी येऊन परिस्थिती आटोक्यात आणली.