Saif Ali Khan : जिन्यातून उतरला अन् कॅमेऱ्यात टिपला गेला; पोलिसांकडून आरोपीचा व्हिडिओ जारी
Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात चोरीच्या उद्देशाने घरात शिरुन जीवघेणा हल्ला घडल्याची घटना घडलीयं. या घटनेत जखमी झालेल्या सैफ अली खानवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे पोलिसांच्या तपासपथकाच्या हाती आरोपीचा फोटो लागल्याची माहिती समोर आलीयं. आरोपी दुसऱ्या इमारतीच्या मागच्या बाजूने येऊन चोरीच्या उद्देशानेच सैफच्या घरात गेल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. यावेळी सहाव्या मजल्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी कैद झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आम्ही लवकरच आरोपीला अटक करणार असल्याचं पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितलंय.
सैफ अली खानवर मध्यरात्री हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो पोलिसांकडून जारी #SaifAliKhanNews #Saif #SAIFALIKHANATTACK #Bollywood #MumbaiPolice pic.twitter.com/UxFaSTILNd
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) January 16, 2025
या आरोपीची पोलिसांना ओळख पटली असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. दुसऱ्या इमारतीतून मागच्या बाजूने तो आला. त्या ठिकाणी एक जाळी तुटली होती त्यातून तो आतमध्ये आला. पाईप आणि शिडीच्या माध्यमातून तो वर चढला. सहाव्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचे फोटो समोर आले आहेत. याच आधारे त्याची ओळख पटलीयं असून दुसऱ्या इमारतीच्या कॅमेऱ्यातून तो बाहेर जाताना दिसत आहे, पण जाताना त्याच्या तोंडावर रुमाल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करून पळ काढताना आरोपी सीसीटिव्हीत कैद #Saif #SaifAliKhanNews #SAIFALIKHANATTACK #Bollywood #AttackOnSaif pic.twitter.com/lPDVhgGxx5
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) January 16, 2025
सैफवर जीवघेणा हल्ला; हे लोलो…ऑल ओके? खासदार सुप्रिया सुळेंचा थेट करिश्मा कपूरला फोन
दरम्यान, या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे 10 ते 15 पथकांची टीम तयार करण्यात आली असून लवकरच आरोपीला आम्ही अटक करणार असल्याचा विश्वास पोलिस अधीक्षक गेडाम यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलायं. या जीवघेण्या हल्ल्यात सैफ जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफच्या घरी काम करणाऱ्या एरियामा फिलिप्स उर्फ लिमा यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलायं. यासोबतच टरेस पासिंग, चोरीसह कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलायं.