भारतीय हवाई दलाच्या शौर्याला सलाम! नेटफ्लिक्सच्या ‘ऑपरेशन सफेद सागर’चे प्रेरणादायी गीत प्रदर्शित

Operation Safed Sagar या नेटफ्लिक्सवरील आगामी मालिकेतील दुसरे प्रेरणादायी गीत 'आझमा ले' प्रदर्शित केले आहे.

Operation Safed Sagar

Operation Safed Sagar

Salute to valour of Indian Air Force Inspiring song from Netflix’s ‘Operation Safed Sagar’ released : ‘ऑपरेशन सफेद सागर’ या नेटफ्लिक्सवरील आगामी मालिकेतील पहिले गीत ‘दिलवाले दिलसाज परिंदे’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्य्यानंतर आता नेटफ्लिक्स आणि टी-सीरिजने मालिकेतील दुसरे प्रेरणादायी गीत ‘आझमा ले’ प्रदर्शित केले आहे. हे गाणे भारतीय हवाई दलातील तरुण वैमानिकांचे धैर्य, जिद्द आणि देशसेवेप्रती असलेली निष्ठा प्रभावीपणे साकारते.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी औकिब नबी टीम इंडियात ! कोण आहे वेगवान गोलंदाज ?

कारगिल युद्धातील सर्वात धाडसी आणि फारशी चर्चेत न आलेल्या ‘ऑपरेशन सफेद सागर’ मोहिमेवर आधारित असलेले हे गीत ‘गोल्डन अॅरोज’ स्क्वॉड्रनच्या शौर्यगाथेला उजाळा देते. संकटांना न घाबरता देशाच्या हाकेला प्रतिसाद देणाऱ्या वीर जवानांच्या अदम्य इच्छाशक्तीला या गाण्यातून भावपूर्ण सलाम करण्यात आला आहे.

रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटकडून ‘एक्सेल म्युझिक’ची घोषणा

विशाल ददलानी यांच्या दमदार आवाजाला सिद्धार्थ पंडित यांचे प्रेरणादायी संगीत आणि आलोक रंजन श्रीवास्तव यांचे हृदयस्पर्शी गीत लाभले आहे. जोशपूर्ण संगीत आणि प्रभावी शब्दांमुळे हे गाणे भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांच्या भावनिक तसेच शारीरिक संघर्षाचे वास्तव चित्रण करते. त्यांच्या त्याग, संयम आणि अशक्य वाटणाऱ्या आव्हानांवर मात करण्याच्या धैर्याचा यात गौरव करण्यात आला आहे.

सरकारकडून दिलेले आश्वासन पाळण्यात विलंब; अभिजीत दिपके विद्यार्थ्यांसह पुन्हा मैदानात उतरणार

या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये वैमानिकांमधील मैत्री, परस्पर विश्वास आणि प्रत्येक उड्डाणामागील जबाबदारीचे भावविश्व प्रभावी दृश्यांमधून उलगडण्यात आले आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शूर वीरांना ही एक भावपूर्ण संगीतमय श्रद्धांजली ठरते.’ऑपरेशन सफेद सागर’ ही मालिका भारताच्या इतिहासातील एका निर्णायक पर्वावर आधारित आहे. जगातील सर्वाधिक उंचीवर पार पडलेल्या हवाई लष्करी मोहिमेची ही कथा असून, भारतीय हवाई दलाच्या सर्वात तरुण स्क्वॉड्रनने या मोहिमेदरम्यान दाखवलेल्या अद्वितीय शौर्याची कहाणी यात मांडण्यात आली आहे.

Shivsena Vs BJP : शिंदेंची भाजपवर मात GenZ मतांसाठी आखला खास ‘मास्टर’ प्लॅन….

ओनी सेन दिग्दर्शित या मालिकेची निर्मिती अभिजीत सिंह परमार आणि कुशल श्रीवास्तव यांनी केली असून मॅचबॉक्स शॉट्स एलएलपीचे संजय राउत्रे आणि सरिता पाटील, तसेच फील गुड फिल्म्सचे महबूब पाल सिंह बराड हे निर्माते आहेत. मालिकेत सिद्धार्थ, जिमी शेरगिल, अभय वर्मा, दिया मिर्झा, प्राजक्ता कोळी, आदिल हुसेन, मिहिर आहुजा, तारुक रैना, अर्नव भसीन आणि अमृता बागची यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘आझमा ले’ हे गीत आता सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, त्याचा म्युझिक व्हिडिओ टी-सीरिजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे. तर ‘ऑपरेशन सफेद सागर’ ही मालिका ७ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version