सरकारकडून दिलेले आश्वासन पाळण्यात विलंब; अभिजीत दिपके विद्यार्थ्यांसह पुन्हा मैदानात उतरणार
Abhijeet Dipke to Protest Again at Jantar Mantar सरकारने दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा दिपकेंचा इशारा
Abhijeet Dipke to Protest Again at Jantar Mantar : कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipake) यांनी केंद्र सरकारला पुन्हा एकदा इशारा देत, जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान मान्य करण्यात आलेल्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. सरकारने आश्वासनांची पूर्तता केली नाही, तर पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन (Jantar mantar Protest) करावे लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला.
रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटकडून ‘एक्सेल म्युझिक’ची घोषणा
प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत प्रलंबित
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, जंतरमंतरवरील आंदोलनानंतर सरकारने काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे संकेत दिले होते. मात्र, अद्याप त्या मागण्यांची अंमलबजावणी झालेली नाही. विशेषतः आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदार, खासदार फोडण्यासाठी कोट्यवधी खर्च करता पण मदतीसाठी नियम तपासतात
दिपके म्हणाले, “केंद्र सरकारने अजूनही आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई दिलेली नाही. माझ्या ऐकण्यात आले आहे की, सरकार आधी नियम आणि कायदे तपासणार, त्यानंतर भरपाईबाबत निर्णय घेणार आहे. मात्र, आमदार किंवा खासदार फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, तेव्हा कोणतेही नियम किंवा कायदे आड येत नाहीत. पण विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मदत करण्याची वेळ आली की सरकार नियमांचे कारण पुढे करत आहे.”
दिलेली आश्वासने वेळेत पुर्ण करावी अन्यथा…..
सरकारच्या या भूमिकेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्राने संवेदनशील भूमिका घेण्याची गरज असल्याचे सांगितले. आंदोलनादरम्यान झालेल्या चर्चेनुसार सरकारने दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा देशभरातील विद्यार्थी आणि पालकांना सोबत घेऊन पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन उभारले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिपके यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतर या आंदोलनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याबाबत कोणती भूमिका घेते, यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील.
#WATCH | Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra | Cockroach Janta Party (CJP) Founder Abhijeet Dipke says, "Our demand was the resignation of the Education Minister, and it was met. But in place of him (Dharmendra Pradhan), who was made the Education Minister? It was Pralhad… pic.twitter.com/X0HnBeoJTw
— ANI (@ANI) August 3, 2026
बांकीपूरमध्ये भाजपचा बालेकिल्ला ढासळला? प्रशांत किशोर 18 व्या फेरीनंतर 10 हजार मतांनी आघाडीवर