तमन्ना भाटियाच्या दागिन्यांची अभिनेत्री; समंथा रुथ प्रभू झाली चाहती !

Samantha Ruth Prabhu Tamannaah Bhatia अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटीयाने ज्वेलरी विश्वात नवा ब्रॅंड घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Samantha Ruth Prabhu Tamannaah Bhatia

Samantha Ruth Prabhu Tamannaah Bhatia

Samantha Ruth Prabhu becomes a fan of Tamannaah Bhatia’s jewelry : अभिनयापासून अगदी फॅशन, नृत्य अश्या प्रत्येक गोष्टीत कायम अग्रगण्य असलेली बहुआयामी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटीया. अभिनयाच्या सोबतीने वेगवेगळ्या विश्वात तिने कायम स्वतःची एक वेगळी ओळख संपादन केली असून काही महिन्यांपूर्वी तमन्नाने ज्वेलरी विश्वात पदार्पण करून नवा ब्रॅंड घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

“पंकजा मुंडे भाजप सोडा, राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हा” काँग्रेसच्या मोठ्या नेत्याकडून मोठी ऑफर!

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या समंथा रुथ प्रभू हिने नुकतेच तमन्ना भाटियाच्या फाइन ज्वेलरी ब्रँडमधील सुंदर आकर्षित पाचू (एमराल्ड) आणि फिरोजा (टर्कॉईज) असलेले झुंबर-शैलीतील कानातले परिधान केले आणि एक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला त्यासोबतचे तिने सुंदर कॅप्शनही लिहिलं ! या कौतुकाचा खास क्षण तमन्नानेही शेअर केला आणि समंथाचे तितक्याच प्रेमाने कौतुक करत लिहिले सौंदर्य आणि सोज्वळतेचे मूर्तिमंत रूप”

ब्लॉकबस्टर ठरलेला “तुंबाडची मंजुळा” चित्रपट 7 ऑगस्ट रोजी मराठी Zee5 वर होणार प्रदर्शित !

तमन्नाला तिच्या कामाची मैत्रिणी कडून मिळालेली गोड पोचपावती देखील तितकीच खास आहे अस म्हणायला हरकत नाही. भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी आणि अभिनेत्री तिच्या ज्वेलरी लाईनमधील दागिने निवडताना दिसत आहेत. तमन्ना साठी ही बाब अगदीच कौतुकाची आहे.

 

Exit mobile version