Download App

समांथाच्या बहुचर्चित ‘शाकुंतलमचा’ ट्रेलर रिलीज

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभु गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती चर्चेत असण्याची कारण म्हणजे तिचा घटस्फोट, आजारपण पण आता समांथा रुथ प्रभु चर्चेत आहे. ते तिच्या आगामी चित्रपट ‘शाकुंतलममुळे’. सामंथा रुथ प्रभुचा बहुचर्चित चित्रपट ‘शाकुंतलमचा’ ट्रेलर रिलीज झाला आहे.

रिलीज झाल्यापासून हा ट्रेलर सोशल मिडीयावर ट्रेंड करतोय. हा ट्रेलर तेलुगूशिवाय हिंदीमध्ये देखील रिलीज करण्यात आला आहे. 2 मिनिट 52 सेकंडच्या या शकुंतलमच्या ट्रेलरने पुन्हा एकदा सामंथा देशभर आणि जगभर पोहोचण्यासाठी सज्ज झाली आहे.

दरम्यान मायोसिटिस नावाच्या ऑटो-इम्यून आजाराने ग्रस्त असलेली अभिनेत्री समांथा रुथ प्रभुच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. सामंथा आता पुन्हा कामवर परतली आहे. समांथाने गुरुवारी सोशल मिडीयवर यासंदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे.

समांथाने आगामी चित्रपट ‘शाकुंतलम’ साठी डबिंग सेशनचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ऑस्ट्रेलियन लेखिका निक्की रोवेचा एक वाक्य शेअर केले आहे. ‘जगात हे वेड, उदासीनता आणि एकटेपणासाठी माझी कला माझा इलाज आहे आणि त्यातून मी स्वतः जाईल. -निक्की रोवे #शकुंतलम’ असं कॅप्शन तीने दिलं आहे.

2023 च्या सुरुवातीला, समांथाने नव वर्षासाठी संकल्प एअर करत सकारात्मकता दाखवली होती. तर नुकतच समांथा रुथ प्रभुने प्रकृतीमुळे अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओची वेब सीरीज सिटाडेलमधून बाहेर पडणार आहे. अशा चर्चा होत्या. तर तिच्या जवळच्या व्यक्तींनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत. तिच्या टीमने सांगितले की, ‘ती जानेवारीच्या मध्यात शूटिंग सुरू करेल.” शकुंतलम नंतर, सामंथा रुथ प्रभू कुशीमध्ये विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Tags

follow us