Download App

‘हाथी घोडा पालकी, बर्थडे कन्हैया लाल की’ स्टार प्लसवरील जन्माष्टमी विशेष कार्यक्रमाबद्दल समृद्धी शुक्लाने व्यक्त केल्या भावना

Samruddhi Shukla : जन्माष्टमीच्या मंगल प्रसंगी स्टार प्लस ‘हाथी घोडा पालकी बर्थडे कन्हैया लाल की’ (Haathi Ghoda Palki, Birthday Kanhaiya Lal

  • Written By: Last Updated:

Samruddhi Shukla : जन्माष्टमीच्या मंगल प्रसंगी स्टार प्लस ‘हाथी घोडा पालकी बर्थडे कन्हैया लाल की’ (Haathi Ghoda Palki, Birthday Kanhaiya Lal Ki) या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून हा जन्मोत्सव साजरा करणार आहे. प्रस्तुत सोहळ्यात या वाहिनीवरील लोकप्रिय कलाकार एकत्र येऊन एक दिमाखदार आणि रंजक खेळांनी भरलेला कार्यक्रम हर्षोल्लासाने सादर करणार आहेत. श्रीकृष्णजन्माचे निमित्त आहे आणि या सोहळ्यात पारंपरिक रीती आणि खेळकर स्पर्धा यांचे मिश्रण असेल, ज्यामुळे सहभागी आणि प्रेक्षक अशा सर्वांसाठीच ही रजनी संस्मरणीय असेल.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत अभिराची भूमिका करणारी समृद्धी शुक्ला सदर (Samruddhi Shukla) आनंद-सोहळ्यात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त करताना म्हणते, “तो एक अत्यंत संस्मरणीय अनुभव होता. इतर इव्हेंटमध्ये येते त्याप्रमाणे या सोहळ्यातही खूप मजा आली. मला वाटते, स्टार प्लसला हे बरोबर कळले आहे की, आमचे लाड कसे करायचे. आम्हाला या कार्यक्रमात सहलीचा आनंद मिळाला. अशा कार्यक्रमातून सगळ्यांना भेटण्याची, त्यांच्याशी गप्पा-टप्पा करण्याची आणि मजेत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळते. स्टार प्लस जे इव्हेंट किंवा क्रियाकलाप योजते, त्यात सहभागी होताना काम केल्यासारखे न वाटता आम्हा सगळ्यांना जणू प्ले डेटवर गेल्यासारखे वाटते.”

जन्माष्टमीच्या आपल्या व्यक्तिगत आठवणी शेअर करताना समृद्धी म्हणाली, “लहानपणी, आपल्या कॉलनीत फेरफटका मारायचा आणि प्रत्येक गल्लीतील दही-हंडीची चुरस बघायची हा माझा आवडता क्रम होता. आमचा चहा-पाण्याचा कार्यक्रम असायचा आणि आम्ही मित्र-मैत्रिणींसोबत खूप मस्ती करायचो. कृष्ण-जन्माच्या दिवशी रात्री 12 वाजता माझे आई–वडील मला मंदिरात घेऊन जात असत, जिथे आम्ही भाजनाचा आनंद घ्यायचो. जन्माष्टमी साजरी करण्याची ही माझी सगळ्यात जुनी आणि मनाला आल्हाद देणारी आठवण आहे.”

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 

प्रस्तुत कार्यक्रमात मुले विरुद्ध मुली अशी एक मजेदार स्पर्धा स्टार प्लसने योजली आहे. यावर्षी खिताब कोण जिंकणार बरं? पहात रहा, ‘हाथी घोडा पालकी, बर्थडे कन्हैया लाल की’ या शनिवारी 16 ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजता फक्त स्टार प्लसवर.

follow us