Video Viral : पतीने दिलेली वागणूक पाहून चाहते संतापले! व्हिडीओ व्हायरल होताच सना खान म्हणाली…

Sana Khan Video Viral: सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. दरवर्षी रमजानमध्ये (Ramadan ) बाबा सिद्दीकी इफ्तार पार्टीचे (Baba Siddiqui Iftar Party) आयोजन करतात, त्यांच्या या पार्टीला अनेक मोठे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. (Video Viral) या पार्टीला भाईजान, शाहरुख खान, शहनाज गिलसोबतच अनेक मोठं मोठे सेलिब्रिटी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 17T110628.929

Sana Khan Video Viral

Sana Khan Video Viral: सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. दरवर्षी रमजानमध्ये (Ramadan ) बाबा सिद्दीकी इफ्तार पार्टीचे (Baba Siddiqui Iftar Party) आयोजन करतात, त्यांच्या या पार्टीला अनेक मोठे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. (Video Viral) या पार्टीला भाईजान, शाहरुख खान, शहनाज गिलसोबतच अनेक मोठं मोठे सेलिब्रिटी या पार्टीला हजेरी लावली.


इस्लामसाठी अभिनयक्षेत्र सोडणारी सना खान (Sana Khan) देखील या पार्टीला पतीसोबत आली होती, पण तिचा एक व्हिडीओ (Video) सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सना खानही पती अनससोबत या पार्टीला पोहोचली होती. त्यांनी मीडियाला फोटोसाठी पोज देखील दिले. पण त्यानंतर अचानक तिचा पती तिचा हात धरून वेगाने चालत तिला घेऊन जात असल्याचा दिसून आला.

सना खान सध्या गर्भवती आहे, या अवस्थेत तिला अशाप्रकारे ओढत घेऊन जाणाऱ्या अनसवर नेटकरी सध्या संतापले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सनाने पतीची बाजू मांडली आहे. ‘विरल भयानी’ नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सना आपण थकल्याचे म्हणत असल्याचे दिसून आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.


‘तुम्ही तुमच्या गरोदर पत्नीशी नीट वागू शकत नसाल, तर उपवास करून काय उपयोग. कल्पना करा की तिला सर्वांसमोर अशी वागणूक दिली जात आहे, तर चार भिंतींच्या आड तिला कसे वागवले जातं असणार आहे, अशी कॉमेंट्स सध्या जोर धरत आहेत.

चीकू अजून लहानच, कोहलीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

यावर काय म्हणाली सना खान?

हा व्हिडीओ नुकताच मी बघितला आहे, माझ्या सर्व प्रिय बंधू आणि बहिणींना हा व्हिडीओ विचित्र वाटत आहे, हे मला माहीत आहे. आम्ही बाहेर आल्यावर ड्रायव्हर आणि कारशी आमचा संपर्क तुटला होत नव्हता. यामुळे मी नेहमीपेक्षा जास्त वेळ उभे होते. मला घाम येऊ लागला आणि मी अस्वस्थ झाले. यामुळे अनस मला पटकन हाताला घेऊन आत नेत होता, जेणेकरून मी बसू शकेन आणि पाणी घेऊ शकेन.

नाट्य परिषद निवडणूक : प्रशांत दामलेंकडून कांबळींच्या सत्तेचे वस्त्रहरण

त्यामुळे कृपया हा व्हिडीओ पाहून इतर कोणतेही विचार करू नका हीच विनंती आहे. तुमच्या काळजीबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार,” असं सना खानने या व्हिडीओवर कॉमेंट्स मध्ये स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, सना खानने २०२० मध्ये मुफ्ती अनस सैय्यदशी लग्नगाठ बांधली. यानंतर तिने ग्लॅमर इंडस्ट्री सोडली. इस्लामसाठी आपण हे क्षेत्र सोडत असल्याचे सना खान यावेळी म्हणाली होती. आता लग्नाच्या ३ वर्षांनंतर सना गर्भवती आहे.

 

 

Exit mobile version