Download App

नव्या वर्षात मित्रांची धमाल घेऊन येतोय ‘संगी’; जानेवारीत ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

  • Written By: Last Updated:

Sangee Hindi Movie Release Date : मित्रांची धमाल दाखवणारा संगी चित्रपट (Sangee Movie) पुढील वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा चित्रपट `17 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित , सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ हा हिंदी चित्रपट (Hindi Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित कुलकर्णी यांनी केले आहे. तर लेखन थोपटे विजयसिंह सर्जेराव यांचे आहे.

अतिक्रमणांवर हातोडा! रस्त्यांचा श्वास मोकळा; नगर महापालिकेची धडक मोहीम

रोहन भोसले, अरुण प्रभुदेसाई, पिंटू सॉ, मोनिका प्रभुदेसाई, प्रतीक ठाकूर, सुमित कुलकर्णी हे ‘संगी’चे निर्माते आहेत. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि राहुल किरणराज चोप्रा सहनिर्माते (Sangee Movie Release Date) आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात शरीब हाश्मी, संजय बिष्णोई, श्यामराज पाटील, विद्या माळवदे आणि गौरव मोरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Manu Bhaker : ‘खेलरत्न’ साठी इतिहास रचणाऱ्या मनुचा ‘खेळ’; कशी होते पुरस्कारांसाठी निवड?

संगी म्हणजेच मैत्री… त्यामुळे याचे कथानक मैत्रीभोवती फिरणारे आहे. मात्र पोस्टरमध्ये तीन मित्र दिसत असतानाच काही नोटाही दिसत आहेत. त्यामुळे आता पैसे आणि मैत्री यांचा एकमेकांशी काय संबंध (Bollywood News) असणार हे जाणून घेण्यासाठी 17 जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकंदरच हलकीफुलकी, हास्य आणि मनोरंजनाने भरलेली कथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवणारा असेल, हे नक्की !

चित्रपटाचे दिग्दर्शक सुमित कुलकर्णी म्हणाले की, ‘संगी’ हा फक्त एक चित्रपट नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यातील हास्यरसाचा अनुभव आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असला तरी घरातील प्रत्येकाने हा चित्रपट आपल्या मित्रपरिवारासोबत आवर्जून पाहावा. हा चित्रपट अनेकांना नॉस्टॅल्जिक बनवेल. ‘संगी’ विनोदी चित्रपट असला तरी यात भावनाही दडलेल्या आहेत.

 

follow us