Download App

Sangharsh Yoddha : निर्मात्यांची मोठी घोषणा! ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर सुसाट

Sangharsh Yoddha Movie : "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर, दुसरीकडे चित्रपट निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie : गेल्या काही दिवसांपासून राज्यभर भयंकर चर्चेत असलेला आणि 14 जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. (Marathi Movie) ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil ) या चित्रपटाच्या टीमने आज छत्रपती संभाजीनगर येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा 100 टक्के नफा मराठा समाजाला (Maratha Reservation) जाहीर केला आहे.


समाजाला मदत म्हणून जाहीर :

मला आनंद वाटतोय की एक खरा संघर्ष माझ्या लेखणी मधून आणि निर्मिती मधून राज्याच्या पुढे येतोय अस देखील गोवर्धन दोलताडे बोलले , मला या चित्रपटातून एक रुपया देखील कमविणे हा माझा हेतू नाही, उलट मला आनंद होईल की ह्या चित्रपटाचा जेवढा जास्तीत जास्त व्यवसाय होईल तो सर्व समाजाला मदत म्हणून जाहीर करतोय, सर्वांनी जरांगे पाटील यांचा संघर्ष पुढे यावा आणि ह्या लढ्याला अजून ताकत मिळावी.

लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर…:

या अनुषंगाने महाराष्ट्रामधील करोडो संख्येने संघर्षयोद्धा चित्रपट पहावा, त्याचबरोबर ह्या चित्रपटातून कोणाच्या भावना दुखावणार नाही ह्याची काळजी आम्ही घेतली आहे. पण तरी देखील जर काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी निर्माता म्हणून सर्वांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.

Maratha Reservation : दारं बंद केली तर, पुन्हा उघडणार नाही; जरांगेंनी अल्टिमेम देत दिली डेडलाईन

सर्व रेकॉर्ड ब्रेक करेल:

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट राज्यभर हाऊसफुल होतोय , भरभरून शो वाढत आहेत , प्रेक्षकांन कडून चित्रपटाची जास्त प्रमाणात मागणी देखील होत आहे असं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे बोलले , संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टी मधील सर्व रेकॉर्ड ब्रेक करेल अस वाटते , त्यांच बरोबर या चित्रपटाला मनोज जरांगे पाटील यांच्या शुभेच्छा आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत , या चित्रपटामुळे एक खरा संघर्ष पुढे येईल यांचं गोष्टीसाठी बनवलेला आहे असं अभिनेता रोहन पाटील यांनी मत व्यक्त केलं आहे.

यावेळी पत्रकार परिषदला सह निर्माते रामदास एकनाथ मेदगे , जान्हवी मनोज तांबे , विठ्ठल अर्जुन पचपिंड , नितीन लोहोकरे व सर्वच चित्रपटाची टीम उपस्थित होती , चित्रपटाचा संपूर्ण नफा समाजासाठी जाहीर केला जातोय हा खूप धडाडीचा निर्णय वाटतो , त्यामुळे चित्रपटाची जास्तच चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

follow us