Maratha Reservation : …अन्यथा राज्यात खूप मोठं आंदोलन; मनोज जरांगेंचा कडक इशारा

Maratha Reservation : …अन्यथा राज्यात खूप मोठं आंदोलन; मनोज जरांगेंचा कडक इशारा

Maratha Reservation : 6 जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा राज्यात खूप मोठं आंदोलन होणार असल्याचा कडक इशारा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj jarnage Patil) सरकारला दिलायं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 4 जूनपासून अंतरवली सराटीत उपोषणाची घोषणा जरांगेंनी केलीयं. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी सरकारला इशारा दिलायं. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधलायं.

अल्पवयीनांना दारु पुरविणाऱ्या सागर चोरडियासह आणखी एका बार मालकाविरोधात दोषारोपपत्र; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मनोज जरांगे म्हणाले, दौरा करण्यासाठी मी रुग्णालयातून सुट्टी घेतलेली आहे. 21 ते 24 तारखेपर्यंत दौरा असणार आहे. तर 4 जून रोजी अंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु करण्यात येणार आहे. मी आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही, लोकसभेच्या गुलालात आम्हाला पडायचं नसून आरक्षणाच्या गुलालात पडायचं असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

Yami Gautam: गूड न्यूज! ‘आर्टिकल 370’ फेम अभिनेत्री बनली आई, यामी गौतम-आदित्य धरला पुत्ररत्न प्राप्त

तसेच आरक्षणाचा गुलाल आमच्यासाठी महत्वाचा आहे. आमचे लोकं मोठे झाले तर आमचं कल्याण होईल, त्यामुळे आम्ही आमच्या न्याय हक्कांसाठी अंतरवलीत एकवटणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे.

देशात परिवर्तन अटळ! जनता भाजप आणि मित्रपक्षांचा सुफडा साफ करणार; कॉंग्रेस नेत्याचा दावा

हैद्राबादचं गॅझेट लागू करा :
मराठा आणि कुणबी हा एकच असून सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, सोबतच हैद्राबादचा गॅझेट लागू करावी, अशा आमच्या प्रमुख मागण्या असून 6 जूनपर्यंत आरक्षण द्या नाहीतर मोठं आंदोलन होणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलोयं :
आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार दिले नसले तरी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व 288 जागांवर उमेदवार देणार आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाला पाडा हे सांगितलेले नाही, पण कोणी गैर अर्थ काढू नये. या निवडणुकीत मी किंवा मराठा समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही किंवा एकही अपक्ष उमेदवार उभा केलेला नाही असं मतदानानंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले. आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो असल्याचंही ते म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज