बारस्करांचे आरोप अन् जरांगेंचं एकच वाक्य; विषयच संपवला

बारस्करांचे आरोप अन् जरांगेंचं एकच वाक्य; विषयच संपवला

Manoj Jarange On Ajay Baraskar : मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांचे माजी सहकारी अजय बारस्कर महाराज यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर स्वरुपात आरोप केल्याचं पाहायला मिळालं आहे. अजय बारस्कर महाराजांनी आजही मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका करीत आरोप केले आहेत. त्यावर माध्यमांकडून जरागे यांना प्रश्न विचारताच मनोज जरांगे यांनी एकाच वाक्यात विषय संपवल्याचं दिसून आलं आहे. कोणालाही वेळ द्यायला माझ्याकडे वेळ नसल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी अजय बारस्कर महाराजांच्या आरोपांचा विषय एकाच वाक्यात संपवला आहे.

“तुझं काम चांगलं नाही… ” : नागपूरमध्ये रागाच्या भरात ज्युनिअरकडून सिनिअरची हत्या

मनोज जरांगे यांनी आज अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. यावेळी माध्यमांकडून त्यांना अजय बारस्कर महाराजांनी केलेल्या आरोपांबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले सरकारने उभ्या केलेल्या लोकांना वेळ द्यायला माझ्याकडे वेळ नाही , असं कोणालाही वेळ द्यायला वेळ नाही, असं म्हणत जरांगे यांनी अजय बारस्कर महाराजांच्या आरोपांवर बोलणं टाळल्याचं दिसून आलं आहे.

तीर्थपुरीत बस जाळली, मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने अंबडमध्ये संचारबंदी लागू, इंटरनेट सेवाही बंद

काय म्हणाले अजय बारस्कर महाराज?
मनोज जरांगे पाटील यांनी काल जे केले तो तमाशा होता. त्यामुळं मराठा समाजाची बदनामी झाली आहे. त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. याउलट माझ्यावर व्यक्तिगत आरोप केले. त्यासाठी त्यांनी माफी माागावी. मी त्यांना जे प्रश्न विचारले, ते सर्व आरक्षणासंबंध होती. त्यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तुम्ही पारदर्शकतेचा भंग केल्याचा आरोप मी केला होता. त्याला उत्तर द्या, माझी भूमिका समाजाप्रती सकारात्कम असल्याचं अजय बारस्कर म्हणाले आहेत.

तसेच मनोज जरांगे पाटील यांनी आता माझ्यावर आरोप केले आहेत. मात्र, त्यांनी माझी माफी मागायला हवी होती. त्यांनी ती माफी मागितली नाही. त्यांनी माझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही किंवा खंडनही केले नाही. उत्तर देण्याऐवजी मला धमक्या दिल्या जात आहेत, अपमानित केले जात आहे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी सत्य माडंत आहे. मी वारंवार आक्षेप घेतला, प्रश्न विचारले, याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्यांनी माझ्यावर बलात्कार आणि पैसे घेतल्याचा आरोप केला. पण मी जाहीरपणे सांगतो, माझी नार्को टेस्ट करा, मी कोणत्याही तपासाला सामोरे जाण्यास तयार आहे. नेतृत्व कसं नसावं हे काल पाहिलं. कालचा संपूर्ण प्रकार तमाशा होता. माझ्याकडून आडमुठेपणा झाल्याचा कबुलीही जरांगे यांनी दिल्याचे बारस्कर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube