तीर्थपुरीत बस जाळली, मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने अंबडमध्ये संचारबंदी लागू, इंटरनेट सेवाही बंद

  • Written By: Published:
तीर्थपुरीत बस जाळली, मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने अंबडमध्ये संचारबंदी लागू, इंटरनेट सेवाही बंद

Manoj Jarange Protest : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) गंभीर आरोप केल होते. फडणवीसांचा आपल्याला जीवे मारण्याचा कट असल्याचा आरोप केला. त्यानंतर आता मराठा बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत. जालना- घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. अंबडहून रामसगावकडे जाणारी ही अंबड आगाराची बस आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीर्थपुरी गावात अज्ञातांनी अडवून पेटवून दिली. या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार एसटी (ST) महामंडळाची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

IND vs ENG Test : यशस्वी, रोहित नंतर रजतसह भारताचा तिसरा बळी, टीम इंडियाला विजयासाठी 92 धावांची गरज 

मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मराठा आंदोलकही आक्रमक होत आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या अंबड आगाराची १८२२ क्रमांकाची बस अंबड-रामसगाव मुक्का करून परत येत होती. सकाळी 06.30 ते 07.00 च्या दरम्यान तीर्थपुरी गावात मराठा आरक्षण आंदोलकांनी दगडफेक करून समोरच्या काचा फोडल्या. तसेच यावेळी आंदोलकांनी बस पेटवून दिली आहे. या घटनेबाबत आगार व्यवस्थापकाच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टोनी ॲबॉट, आयुष्मान खुराना, पुलेला गोपीचंद ‘राष्ट्र उभारणीच्या’ चर्चेसाठी एकत्र; मुलाखतीदरम्यान खुलासा 

दरम्यान, बस जाळल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्य परिवहन मंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून एसटी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यातील बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परिवहन मंडळाने जिल्ह्यातील 5 आगारांच्या बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला असून, पोलिसांचा पुढील आदेश येईपर्यंत बसेस बंद राहणार आहेत. विशेष म्हणजे पैठण-संभाजीनगर एसटी बससेवा बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद
जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यभरात आंदोलक देखील आक्रमक होतांना दिसत आहेत. जालन्यात एसटी बस पेटवल्याची घटना समोर आल्यानंतर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

टोनी ॲबॉट, आयुष्मान खुराना, पुलेला गोपीचंद ‘राष्ट्र उभारणीच्या’ चर्चेसाठी एकत्र; मुलाखतीदरम्यान खुलासा 

अंबड तालुक्यात संचारबंदी लागू

मनोज जरांगेंनी थेट फडणवीसांवर आरोप केले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगेंच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत. त्यामुळे या भागात मराठा आंदोलकांवर संचारबंदी असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज