मनोज जरांगेंनी मर्यादेत राहावं : चिडलेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी ठणकावलं

मनोज जरांगेंनी मर्यादेत राहावं : चिडलेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी ठणकावलं

मनोज जरांगे यांनी मर्यादेत रहावं, मंत्र्यांबद्दल खालच्या भाषेत बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याच म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी खालच्या भाषेत विधान केल्याचं दिसून आलं आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंनी थेट ठणकावलं आहे.

आम्ही कुठं कमी पडलो, दिलेला शब्द पाळला असल्याचा रोखठोक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना केला आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनात मी मुख्यमंत्री म्हणून स्वत: गेलो आहे, आत्तापर्यंत कोणताही मुख्यमंत्री गेला नाही, मनोज जरांगे जी भाषा बोलत आहेत, ती राजकीय भाषा असल्याचं म्हणत कोणीही कायदा हातात घेऊ शकत नसल्याचा कडक शब्दांत इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंद बोलत होते.

जरांगेंनी नौटंकी बंद करावी, त्यांचा बोलवता धनी…; फडणवीसांवर आरोप होताच भाजपचे नेते आक्रमक

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जसा शब्द दिला होता तो आम्ही पाळला आहे. राज्य सरकारची भूमिका जी होती ती पूर्ण केली असून आज विरोधक आरक्षण टिकणार नसल्याचं म्हणत आहेत. तुम्ही तर आरक्षण दिलं नाही मराठा समाजाचा वापर करुन घेतला मोठे झाले पण समाजाला वंचित ठेवलं आहे. आता आरक्षण दिलं तर ते का टिकणार नाही याचं कारणे तरी द्या. आम्ही मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीत टिकणारं असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.

तसेच मराठा आरक्षणासाठी आम्ही इंपेरिकल डेटा गोळा केलायं. आरक्षण टिकण्यासाठी शासन पूर्ण ताकद लावणार असून विरोधी पक्षाने आरक्षण कसं टिकलं पाहिजे, अशा सूचना न करता टिकणार नाही म्हणतात त्याची कारणेही देत नाहीत. आज आम्ही आरक्षण दिलयं
कुणबी नोंदीही शिंदे समितीकडून शोधल्या आहेत. कायदेशीर प्रक्रिया त्यावर पूर्ण केल्या पाहिजेत. घाईत कोणताही निर्णय घेत नाही. कोणालाही फसवणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

LokSabha Election 2024 : काँग्रेस व आपमध्ये अखेर आघाडी, जागा वाटपही झाले; पण पंजाबामध्ये काय ठरले ?

मराठा समाजाबाबत आम्ही टिकणाराच निर्णय घेतलायं. सर्वांनी संयम पाळावा, कायदा हातात घेऊ नका. आंदोलनकर्त्यांनी या गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे. तेलंगणा हैद्राबादला आपले लोकं गेले. सगेसोयऱ्यांबाबत प्रक्रिया सुरु असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. विरोधी पक्षांकडे कुठलाही मुद्दा राहिलेला नाही. विरोधी पक्षात एकमेकांवर विश्वास नाही. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विरोधकांना राजकारणातच अधिक रस असल्याची टीकाही शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान, मी शपथ घेतली होती त्यानूसार 10 टक्के आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. याआधीही निर्णय घेण्यात आला होता. हाय कोर्टात निर्णय टिकला परंतू सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू न मांडल्याने रद्द झाला. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर शिदे समितीची वेगळं काम सुरु आहे. त्यावर हरकती आल्या आहे त्यावर काम सुरु असून याबाबत सरकार योग्य निर्णय घेणार असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज