टोनी ॲबॉट, आयुष्मान खुराना, पुलेला गोपीचंद ‘राष्ट्र उभारणीच्या’ चर्चेसाठी एकत्र; मुलाखतीदरम्यान खुलासा

टोनी ॲबॉट, आयुष्मान खुराना, पुलेला गोपीचंद ‘राष्ट्र उभारणीच्या’ चर्चेसाठी एकत्र; मुलाखतीदरम्यान खुलासा

Ayushmann Khurrana: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. आयुष्मान आणि अनन्या पांडे या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. अशातच आता अभिनेता-कलाकारच नाही तर एक विचारसरणीचा नेता आणि भारताचा युवा आयकॉन देखील मानला जात आहे.

आयुष्मानने देशावर महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव पाडला आहे. सर्वसमावेशकतेला प्राधान्य देणाऱ्या आणि राष्ट्र उभारणीत योगदान देणाऱ्या त्यांच्या विचारप्रवर्तक चित्रपटांनी त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. अभिनेत्याला राष्ट्र उभारणीतील योगदान आणि मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना टाइम ने ‘टाइम इंपैक्ट पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Box Office: ‘आर्टिकल 370’ची बॉक्स ऑफिसवर जादू; तिसऱ्याचं दिवशी केली एवढी कमाई

आयुष्मानची भारत स्पेशल ऑलिम्पिकसाठी सदिच्छा दूत म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या भारतासाठी युनिसेफचे राष्ट्रीय राजदूत आहेत आणि सॉकर दिग्गज डेव्हिड बेकहॅम यांच्यासोबत संयुक्तपणे EVAC – एरेडिकेशन ऑफ व्हायोलन्स अगेन्स्ट चिल्ड्रन – या महत्त्वाच्या उपक्रमाचे प्रमुख आहेत.

जीवनाच्या विविध क्षेत्रातील त्यांचे योगदान इतके आहे की आयुष्मानला आता ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट, बॅडमिंटन आयकॉन पुलेला गोपीचंद, अमीर हुसैन लोन – जम्मू आणि काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार, आणि इतर दिग्गजांसह भविष्यासाठी राष्ट्र उभारणी या विषयांवर चर्चा करण्यासाठी सामील करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube