अल्पवयीनांना दारु पुरविणाऱ्या सागर चोरडियासह आणखी एका बार मालकाविरोधात दोषारोपपत्र; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अल्पवयीनांना दारु पुरविणाऱ्या सागर चोरडियासह आणखी एका बार मालकाविरोधात दोषारोपपत्र; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Pune Accident Excise Department Action on Bar Owner for served liquor to miner : पुण्यातल्या कल्याणीनगर (Pune News) परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने पोर्शे कारने तरुण-तरुणीला चिरडलं. या घटनेत तरुणीसह तरुणाचा मुत्यू झाला असून या प्रकरणी अल्पवयीन मुलाला न्यायालयाकडून जामीन देण्यात आलायं. मात्र आता या घटनेनंतर पोलिसांनंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभाग ( Excise Department ) देखील ॲक्शन मोडमध्ये आला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या दोन बार मालकांविरोधात दोषारोप पत्र ( Chargesheet ) दाखल केले आहे.

Aamir Khan: अभिनेता ‘सीतारे जमीन पर’चे शूटिंग करत आहे का? चर्चांना उधाण

बार किंवा पबमध्ये अल्पवयीन मुलांना दारू पुरवणाऱ्या बारबद्दल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर पुणे उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. यामध्ये पहिले दोषारोप पत्र हे कोरेगाव पार्कमधील मेरीयट स्वीट्समध्ये ब्लॅक क्लब चालवणाऱ्या पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे सागर चोरडिया यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आले आहे. याच पबमध्ये ज्या बांधकाम व्यवसायिकाच्या मुलाने तरुण-तरुणीला कारने चिरडलं त्याने पार्टी केली होती.

हिंदुत्त्ववादी सरकार हवं! मतदानानंतर बाप-लेकाची प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाले पोंक्षे

चौकशीमध्ये आढळल्या ‘या’ त्रुटी

त्याचबरोबर दुसऱ्या एका घटनेमध्ये पुण्यातील घोरपडी या भागातील ट्रिलियन सिक्युरिटीचे प्रल्हाद भुतडा या बारमालकाविरुद्धही दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. या दोन्हीही बारमध्ये गेल्या 17 मे ते 19 मे दरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचं दिसून आलं आहे.ज्यामध्ये ब्लॅक क्लबमध्ये पोर्शे कारने तरुण-तरुणीला चिरडणारा बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा देखील आढळून आला आहे. त्याचबरोबर अनेक ग्राहकांना परवान्याशिवाय दारू विकली गेली. उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान निरीक्षकांना अधिकृत बार अटेंडंटची यादी देखील सुपूर्द केली गेली नाही. या सर्व तक्रारी अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्तांचा इशारा…

याविरोधात न्यायालयात पोलिसांकडून याचिका दाखल करण्यात येणार असून अपघात प्रकरणी पब, बार, विना नंबर गाडी देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, तरुण-तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कोणालाही सोडणार नसल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube