State Excise Recruitment 2023 : उत्पादन शुल्क विभागात नोकरीची संधी, महिन्याला मिळणार १ लाखाहून अधिक पगार

  • Written By: Published:
State Excise Recruitment 2023 :  उत्पादन शुल्क विभागात नोकरीची संधी, महिन्याला मिळणार १ लाखाहून अधिक पगार

Maharashtra State Excise Department Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमदेवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत लघु लेखक (निम्म श्रेणी), लघु टंकलेखक, जवान (राज्य उत्पादन शुल्क), जवान-नि-वाहक (राज्य उत्पादन शुल्क), शिपाई या पदांसाठी एकूण 717 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 साठी अर्जाची अंतिम तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबद्दल तपशीलवार अधिकृत नोटिफिकेशमध्ये दिली आहे.

Israel Hamas War : गाझा पट्टीतील युध्द थांबवण्याची मागणी करणारा प्रस्ताव UN मध्ये मंजूर, अमेरिका मतदानासाठी गैरहजर 

पदाचे नाव : लघु लेखक (निम्म श्रेणी), लघु टंकलेखक, जवान (राज्य उत्पादन शुल्क), जवान-नि-वाहक (राज्य उत्पादन शुल्क), शिपाई

एकूण रिक्त पदे – ७१७

पदानुसार जागांची संख्या:
लघु लेखक (लोअर ग्रेड): 5 पदे
लघु टंकलेखक : 18 पदे
जवान-राज्य उत्पादन शुल्क (जवान): 568 जागा
जवान-नि-चालक-राज्य उत्पादन शुल्क: 73 जागा
शिपाई (शिपाई): 53 जागा

शैक्षणिक पात्रता –
लघु लेखक (निम्म श्रेणी): 10वी पास + 100 SPM लघुलेखन + इंग्रजी टायपिंग 40 SPM आणि मराठी टायपिंग 30 SPM.

लघुटंकलेखक : 10वी पास + 80 SPM लघुलेखन + इंग्रजी टायपिंग 40 SPM आणि मराठी टायपिंग 30 SPM

जवान (राज्य उत्पादन शुल्क): 10वी पास.

कॉन्स्टेबल-नि-ड्रायव्हर (राज्य उत्पादन शुल्क): 7 वी पास + ड्रायव्हिंग लायसन्स.

शिपाई : 10वी पास.

Devendra Fadanvis : मी त्यांचे भाषणच ऐकले नाही, भुजबळ-जरांगे वादावर बोलणे फडणवीसांनी टाळले 

वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 18 ते 40 वर्षे.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5वर्षांची सूट.

परीक्षा शुल्क-
लघु लेखक (लोअर ग्रेड): 900 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 810 रुपये
लघु टंकलेखक : 900 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 810 रुपये
जवान-राज्य उत्पादन शुल्क (जवान): 735 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 660 रुपये
जवान-नि-चालक-राज्य उत्पादन शुल्क: 800 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 720 रुपये
शिपाई (शिपाई): 800 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 720 रुपये

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्रात.

आवश्यक कागदपत्रे-

1. अर्जातील नावाचा पुरावा (एसएससी किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता)
2. वयाचा पुरावा
3. शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
4. नाव बदलल्याचा पुरावा
5. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचे ज्ञान असल्याचा पुरावा
6. लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र
7. जातीचा दाखला

पगार –
लघु लेखक (लोअर ग्रेड): S-15: 41800-132300 अधिक महागाई भत्ता आणि नियमांनुसार देय भत्ते.
लघु टंकलेखक : S-8: 25500-81100 अधिक महागाई भत्ता आणि नियमांनुसार देय भत्ते.
जवान-राज्य उत्पादन शुल्क (जवान): S-7: 21700-69100 अधिक महागाई भत्ता आणि नियमांनुसार देय भत्ते.
जवान-नि-चालक-राज्य उत्पादन शुल्क: S-7: 21700-69100 अधिक महागाई भत्ता आणि नियमांनुसार देय भत्ते.
शिपाई (शिपाई): S-1: रु 15000-47600 अधिक महागाई भत्ता आणि नियमांनुसार भत्ते.

अधिकृत वेबसाइट – https://stateexcise.maharashtra.gov.in

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात – 17 नोव्हेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2023

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1Z3FP0EhtuSSdUre4RwcD5rHdrQlzJAMZ/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube