Devendra Fadanvis : मी त्यांचे भाषणच ऐकले नाही, भुजबळ-जरांगे वादावर बोलणे फडणवीसांनी टाळले
Devendra Fadanvis : मी छगन भुजबळांचं भाषण ऐकलं नाही. त्यावर मी बोलणार नाही. मला काहीही माहिती नाही. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते भुजबळांच्या भाषणावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे. मात्र मराठा आरक्षणाला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. तो विरोध दर्शवण्यासाठी आज ओबीसी समाज एकवटला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मेळावा घेतला आहे. त्यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे नेते जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
दरम्यान यावेळी फडणवीस यांना जरांगे आणि भुजबळांच्या वादावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले मी सर्व समाजाला तसेच ओबीसी समाजाला विनंती करून इच्छितो की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणामध्ये कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा संकल्प केलेला आहे. पण त्यामध्ये ओबीसी समाजावर कोणताही अन्याय सरकार घेणार नाही. त्यामुळे कोणत्याही समाजामध्ये थेट निर्माण करण्यात येऊ नये आणि महाराष्ट्रामध्ये शांतता कायम ठेवावी.
लाठीचार्जनंतर जरांगे घरात जावून झोपले; टोपे अन् रोहित पवारांनी त्यांना मध्यरात्री उपोषणाला बसवले
त्याचबरोबर छगन भुजबळ, संभाजी राजे किंवा मनोज जरांगे हे एकमेकांना काय बोललेत? हे मी ऐकले नाही. मी प्रवासात होतो. त्यामुळे मी त्यांच्या टीका टपण्णीवर बोलणार नाही. अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. आज इकॉनॉमिक ॲडव्हायझरी काउन्सिलची बैठक होती. त्यावेळी ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया किती वेळा भिडले? फायनलमध्ये कोणाचे पारडे जड
त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, इकॉनॉमिक ॲडव्हायझरी काउन्सिलने ज्या शिफारशी केल्या होत्या. त्या संदर्भातील रोड मॅप प्रेसेंटेशन मंत्रिमंडळात पुढे करण्यात आलं. त्यावरून ह्या शिफारशींची अंमलबजावणी कशी करायची? त्यातून गुंतवणूक कशी निर्माण करायची? त्यासाठी एक रोड मॅप तयार करण्यात आला. त्यावर आता प्रत्येक विभागाकडून त्यांचा रोड मॅप मागून घेण्यात आला. त्यानंतर अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्यात येतील त्यानंतर राज्यातील गुंतवणूक वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. असं फडणवीस म्हणाले.