वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया किती वेळा भिडले? फायनलमध्ये कोणाचे पारडे जड

वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया किती वेळा भिडले? फायनलमध्ये कोणाचे पारडे जड

World cup 2023 Final : विश्वचषक 2023 चा (World cup 2023) अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात होणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघाने पहिल्या सामन्यापासून उपांत्य फेरीपर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे, तर ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाला पहिल्या साखळी सामन्यात भारताविरुद्ध आणि नंतर दुसऱ्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

मात्र, तिसर्‍या सामन्यातून ऑस्ट्रेलियन संघ फॉर्ममध्ये आला होता आणि आता फायनलमध्येही पोहोचला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना नेहमीच खास असतो, पण वर्ल्डकपमध्ये हे दोन संघ किती वेळा भिडले आणि किती वेळा कोण जिंकले हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला माहिती नसेल तर काही रंजक आकडेवारी पाहूया.

World Cup Final : एक दिवसाचं भाडं एक लाख; फायनलआधीच अहमदाबादेत पैशांचा ‘खेळ’!

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
– भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या इतिहासात एकूण 13 वेळा आमनेसामने आले आहेत.
– या 13 विश्वचषक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने 8 सामने जिंकले आहेत.
– भारताला केवळ 5 सामन्यात विजयाची चव चाखण्याची संधी मिळाली.
– आतापर्यंत या दोघांमध्ये विश्वचषकातील एकही सामना टाय झालेला नाही किंवा तो रद्दही झालेला नाही.
– विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या 359 धावा आहे.
– विश्वचषकाच्या इतिहासात भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या 352 धावांची आहे.
– विश्वचषकाच्या इतिहासात भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी धावसंख्या 128 धावांची आहे.

Murderwale Kulkarni: वैभव अन् संतोषची जोडी जमली, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ रंगमंचावर येण्यास सज्ज
– विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सर्वात कमी धावसंख्या 125 धावांची आहे.
– भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय विश्वचषकातील पहिला सामना 13 जून 1983 रोजी खेळला गेला होता, जो ऑस्ट्रेलियाने 162 धावांनी जिंकला होता.
– भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा विश्वचषक सामना या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी खेळला गेला होता, जो भारताने 6 गडी राखून जिंकला होता.
– विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्धचा सर्वात मोठा विजय 1983 मध्ये 162 धावांनी जिंकला होता.
– भारताने 1983 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धही सर्वात मोठा विजय नोंदवला होता, तो सामना 118 धावांनी जिंकला होता.

Sunny Leone: वाराणसीला पोहोचली सनी लिओनी, गंगा आरतीत नोंदवला सहभाग

ही आकडेवारी पाहता विश्वचषकात भारतावर ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे, पण या विश्वचषकात भारतीय संघाचा फॉर्म उत्कृष्ट आहे, हे स्पष्ट होते. आता विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माचा संघ ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवू शकतो का, हे पाहावे लागेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube