‘त्या’ अधिकाऱ्याला नेमकं कोणाचा फोन आला? आमदार रोहित पवारांनी वेगळाच संशय व्यक्त केला…
पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याला नेमका कोणाचा फोन आला होता? असा थेट सवाल आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केलायं.
Mla Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं समोर आलंय. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात रोहित पवार आक्रमक झाल्याचे दिसून आले आहेत. विमान अपघाताप्रकरणी तक्रार देण्यासाठी गेलेल्या रोहित पवारांची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केलीयं. पवार यांची तक्रार घेत असतानाच एका बड्या अधिकाऱ्याने तक्रार घेण्याच नकार दिलायं, या बड्या अधिकाऱ्याला कोणाचा फोन आला होता? असा थेट सवाल आमदार पवार यांनी माध्यमांशी बोलताना केलायं.
होळी, मोहर्रम आणि गांधी जयंतीला ‘ड्राय डे’ राहणार; व्हायरल बातम्यांवर अखेर सरकारचे स्पष्टीकरण
पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले, मी विमान अपघात प्रकरणी पोलिस ठाण्यात एफआरआर दाखल करण्यासाठी आलो. त्यावेळी पोलिसांनी माझं स्टेटमेंट घेण्यासाठी लॅपटॉप सुरु केला. तेवढ्यातच एक वरिष्ठ अधिकारी आला आणि त्याने तक्रार घेण्यास नकार दिला. आम्ही जाब विचारताच हा आमचा अधिकार आहे, तुम्हाला काय कारवाई करायची करुन घ्या, या शब्दांत पोलिस अधिकाऱ्याने उत्तरं दिल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
Debit Card : खिशातील डेबिट कार्डवर मिळतो 10 लाखांपर्यंतचा मोफत विमा, कसा करता येतो क्लेम?
एवढंच नाही तर मी तुमची तक्रार घेऊ शकत नाही. याबाबत तुम्हाला ज्याला सांगायचं त्याला सांगा, जिथं जायचं तिथं जा, कारवाई करा पण आम्ही एफआयआर दाखल करुन घेऊ शकत नाही, या डीसीपीला असा कोणाचा फोन आला म्हणून एफआयआर दाखल करुन घेतली नाही. अजित पवार यांच्याबाबतीत असा वेगळा न्याय का? असा थेट सवाल रोहित पवार यांनी केलायं.
वाढदिवशी नानींसाठी दिग्दर्शकाची अनोखी भेट; ‘द पैराडाइज़’ बद्दल श्रीकांत ओडेला भावूक
उद्या सकाळी बारामती पोलिस ठाण्यात जाऊन आम्ही एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करु ते काय भूमिका घेतात ते पाहू. सत्तेतले नेते काय भूमिका घेतली हेही मी पाहणार आहे. सत्तेतले मित्र पक्ष यावर काय भूमिका घेतात हे मी पाहणार असल्याचंही आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय.
