’60 वर्षांत नाही झालं ते CM शिंदेंच्या आदेशाने सुरु’; शंभूराज देसाईंची टोलेबाजी

’60 वर्षांत नाही झालं ते CM शिंदेंच्या आदेशाने सुरु’; शंभूराज देसाईंची टोलेबाजी

Maratha Reservation : मागील 60 वर्षांत नाही झालं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशाने गतीने काम सुरु असल्याची टोलेबाजी मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विरोधकांवर केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वादंग पेटलेलं असतानाच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरच खापर फोडण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तर सत्ताधारी नेत्यांकडूनही मागील 60 वर्षांचा उल्लेख करीत विरोधकांवर टीका केली जात आहे.

राम शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये बिनसलं? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण

शंभूराज देसाई म्हणाले, आज आमची इच्छा होती की मनोज जरांगे यांनी प्रत्यक्ष चर्चेत सहभागी व्हावं. मात्र, मराठा आरक्षण उपसमितीची बैठकी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झाली आहे. या बैठकीला मनोज जरांगे उपस्थित होते. या बैठकीत मनोज जरांगे यांनी सांगितलेल्या मुद्द्यांची नोंद करण्यात आली असून त्यावर माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येणार आहेत. मागील 60 वर्षांत जे नाही झालं ते मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाने गतीने काम सुरु असल्याचं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं आहे.

महाविकास आघाडीशी घटस्फोट घ्या, दोघे मिळून 24-24 जागा लढवू : आंबेडकरांचा ठाकरेंना प्रस्ताव

तसेच बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीबरोबरच कायदेशीर बाबी काय आहेत? यावरही चर्चा करण्यात आली. सगळ्या गोष्टींवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जरांगे पाटील म्हणतात, सगेसोयरेंनाही कुणबी दाखला देण्यात यावा, त्यायावर त्यांनी विस्तृतपणे सांगावं, त्यानंतर कायदेशीर बाबी आम्ही ज्येष्ठ वकीलांच्या सल्ल्यानुसार पडताळणी करणार असल्याचं देसाई म्हणाले आहेत.

INDIA : नितीश कुमारांचे ‘प्रेशर पॉलिटिक्स’ यशस्वी? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ज्या बाबतीत जरांगे पाटील यांनी आजच्या बैठकीत मुद्दे उपस्थित केले आहेत, त्या सगळ्या गोष्टींची नोंद केली आहे. त्यावर सगळी योग्य ती माहिती घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. योग्य त्या विभागीय अधिकाऱ्यांना आम्ही संबंधित आदेश देणार आहोत. जरांगे पाटील यांना आम्हाला एकच सांगायचं आहे की, मागची ६० वर्षे जे झाले नाही ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशावरुन गतीने काम सुरु असून त्यांनी दोन वेळा मुदतवाढ दिलेली आहे पण तरीही त्यावर आम्ही काम करत आहोत. काम करताना काम अंगलट आलं तर कोर्टात काही चुकीचं झाल्यास आपल्या पायावर दगड पडल्यासारखं वाटू नये म्हणून काळजीपूर्वक आम्ही प्रयत्न करत असल्याचंही देसाई म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज