राम शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये बिनसलं? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण

राम शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये बिनसलं? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण

Ahmednagar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून राम शिंदे (Ram Shinde)यांची ओळख आहे. 1 जानेवारीला आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस झाला. मात्र यादरम्यान चर्चा रंगली ती म्हणजे सोशल मीडियावर (Social Media)ती प्रचंड अॅक्टिव्ह असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या लाडक्या आमदाराला शुभेच्छा द्यायला विसरले. फडणवीस यांच्या सोशल मीडिया पेजवर इतर काही शुभेच्छा दिल्याचे पोस्टर धडकले मात्र राम शिंदे यांना शुभेच्छा दिल्या नाही. कदाचित फोनद्वारे त्यांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्याही असतील मात्र सोशल मीडियावरती ते न दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस यांनी खरंच राम शिंदे यांना शुभेच्छा दिल्या नाही किंवा कोणामार्फत शुभेच्छा पाठवल्या? याबद्दल मात्र काही समजू शकले नाही.

आयारामांना चाप अन् नव्या चेहऱ्यांचा शोध; भाजपने विनोद तावडेंवर सोपविली मोठी जबाबदारी

भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. रोहित पवारांकडून आमदार राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात पराभव झाला मात्र आपल्या नेत्याला बळ देण्यासाठी फडणवीसांनी विधान परिषदेवर शिंदे यांना घेतलं. एक जानेवारीला आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस झाला. राजकीय मंडळींकडून दिवसाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या. मात्र राम शिंदेंना शुभेच्छा द्यायला देवेंद्र फडणीस हे विसरले. फेसबुक तसेच ट्विटर पेजवर त्यांना कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, हे दिसून आले.

‘चर्चा तर होणारच! आयराच्या हळदीला रीना दत्ता अन् किरण राव यांच्या मराठमोळ्या लूकनं वेधलं लक्ष!

नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या फडणवीसांनी सोशल मीडिया पेजवर ज्योतिराज्य सिंधिया-शिंदे, नामदेव ससाणे, मंत्री अब्दुल सत्तार, एन बिरेनसिंहजी, अशोक जी उईके, समीर कुणावर या नेत्यांना शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर सकाळपासूनच सक्रिय असणारे फडणवीस हे इतरांना शुभेच्छा देण्यास विसरले नाही मात्र राम शिंदेंना ते विसरले अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु होती. फडणवीसांनी शिंदेंना फोन करुन शुभेच्छा दिल्या असाव्यात असेही तर्क लावले जात आहेत. मात्र सोशल मीडियावरती शुभेच्छांची पोस्ट न दिसल्याने विरोधकांनी देखील यावर दबक्या आवाजात चर्चा सुरू केली आहे.

शुभेच्छांमध्ये शिंदेंना का डावलण्यात आलं? याबाबत तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. यामध्ये लोकसभेमध्ये 45 हून अधिक जागा जिंकण्यासाठी आता भाजपकडून तयारी करण्यात आली आहे. मात्र नगर जिल्ह्यामध्ये भाजपातील पक्षांतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला आहे. राम शिंदे लोकसभेसाठी इच्छुक असून पक्षातून देखील त्यांच्याच नावाची चर्चा आहे. मात्र आपल्यालाही लोकसभा लढवायची असे राम शिंदे हे जाहीरपणे बोलत आहेत. विखेंचे कट्टर विरोधक समजले जाणारे आमदार लंके यांच्यासोबत एकाच वाहनातून प्रवास करत थेट विखेंना आव्हान देत असल्याचे दिसत आहे. तसेच एका दिवाळीच्या कार्यक्रमांमध्ये ते कोल्हेंच्यासोबत देखील दिसले. यामुळे पक्षांतर्गतच या नेत्यांमध्ये मतमतांतर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

यामुळेच भाजपचे वरिष्ठ नाराज असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे. नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा जिंकण्यासाठी भाजपकडून प्लॅन देखील आखण्यात आला आहे. त्यामुळे स्वतः फडणवीस यांनी लक्ष घातल्याने माझ्याकडून संभाव्य उमेदवार असलेले विखे यांच्या विरोधात कोणतेही पाऊल पडेल अशी भूमिका फडणवीसांना नको आहे, असे देखील बोलले जात असल्याने आमदार राम शिंदे यांना शुभेच्छा देण्याचे टाळले असावे असे देखील आता बोलले जात आहे.

शिंदेंना शुभेच्छा दिल्या की नाही? हा प्रश्न तर अद्यापही अनुत्तरीतच आहे मात्र नगर दक्षिणमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणायचा, यासाठी भाजपकडून जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे. त्यासाठी फडणवीस देखील जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचे देखील सूत्रांकडून समजते. फडणवीस यांच्या नगर जिल्ह्यात दौऱ्यानंतर शिंदे आणि विखे यांच्यातील शीतयुद्धही संपुष्टात येणार का? नगर-दक्षिणचा उमेदवार कोण असणार? हे देखील लवकरच स्पष्ट होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज