‘चर्चा तर होणारच! आयराच्या हळदीला रीना दत्ता अन् किरण राव यांच्या मराठमोळ्या लूकनं वेधलं लक्ष!
Ira Khan Wedding: अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक इरा खान (Ira Khan) ही लवकरच बोहल्यावर चढणार आहे. इरा ही तिचा बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नगाठ बांधणार आहे. इराच्या प्री वेडिंग फंक्शन्सला जोरदार सुरुवात झाली आहे. इरा आणि नुपुर यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला आमिरच्या दोन्ही माजी पत्नी किरण राव आणि रीना दत्ता हजेरी लावली. यावेळी रीना दत्ता आणि किरण राव यांनी मराठमोळा लूक केला होता.
View this post on Instagram
रीना दत्ता आणि किरण राव यांचा लूकछ किरण राव आणि रीना दत्ता या गिफ्ट घेऊन नुपुर शिखरेच्या घरी पोहोचल्या आहेत. यावेळी किरण रावनं जांभळ्या रंगाची महाराष्ट्रीयन नऊवारी, केसांमध्ये गजरा असा मराठमोळा लूक केला होता. तर रीनानं देखील हिरव्या रंगाची महाराष्ट्रीयन नऊवारी साडी परिधान केली होती.
View this post on Instagram
इराच्या शाही लग्नसोहळ्याच्या अगोदर आमिर खानचे मुंबईतील घर लाइट्सनं सजलं आहे. इरानं इंस्टाग्राम आऊंटवर तिच्या केळवणाच्या कार्यक्रमाचे फोटो गेल्या काही दिवसांपासून शेअर करत होती.
प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी शिखरच्या नातेवाईक देखील त्याच्या घरी हजेरी लावत आहेत. नुपूर शिखरेनं प्री-वेडिंग फंक्शनसाठी लाल कुर्ता आणि पांढऱ्या पायजमा असा लूक परिधान केला आहे. त्याने पापाराझीसाठी आपल्या कुटुंबासह पोज देखील दिल्या.
Ira Khan Wedding: होणार सून मी त्या घरची! आमिर खानची लेक इराचे जोरदार प्री-वेडिंग सेलिब्रेशन
इरा ही 3 जानेवारीला नुपुर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली आहे. 10 जानेवारी रोजी इरा आणि नुपुर यांचे रिसेप्शन पार पडणार आहे, असं सांगितलं जात आहे. आयराचा होणारा पती नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. नुपूर हा त्याचे वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ कायम शेअर करत असतो. आयरा आणि नुपूर दोघेही 2020 पासून एकमेकांना डेट करत असल्याचे बघायला मिळत आहेत.