आमिर खानची लेक अडकली लग्नबंधनात, पाहा फोटो

बॉलिबूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान तिची बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकली.

या लग्नाला आमिर खान आणि किरण रावसह जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते.

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह केला.

आयरा खानने तिच्या ड्रीम डेसाठी महाराष्ट्रीयन लूक निवडला.

कोर्ट मॅरेजनंतर मुंबईतील ताज हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टी होणार आहे. या पार्टीसाठी सुमारे 900 लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
