INDIA : नितीश कुमारांचे ‘प्रेशर पॉलिटिक्स’ यशस्वी? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

INDIA : नितीश कुमारांचे ‘प्रेशर पॉलिटिक्स’ यशस्वी? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

I.N.D.I.A Alliance : इंडिया आघाडीतून मोठी बातमी समोर येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) इंडिया आघाडीचे नवे समन्वयक होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेसचं (Congress) पुढाकार घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिल्लीतील जेडीयूच्या (JDU) राष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री नितीश यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोलही केला होता. आगामी निवडणुकांच्या तोंडावर नितीश यांच्या याच कृतीची काँग्रेसमध्ये धडकी भरली आहे. (Bihar Chief Minister Nitish Kumar is likely to be the new coordinator of India Aghadi)

नितीश कुमार यांनी नुकत्याच दिल्लीत झालेल्या जेडीयूच्या बैठकीत काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यांनी केलेल्या कार्यांवर काँग्रेस चर्चा करत नाही, सुचनांकडे लक्ष देत नाही, असे मुख्यमंत्री नितीश म्हणाले होते. याआधीही विधानसभा निवडणुकीच्या वेळी नितीशकुमार यांनी काँग्रेसला टोला लगावला होता. इंडिया आघाडीपेक्षा काँग्रेसचे लक्ष विधानसभा निवडणुकीवर अधिक असल्याचे ते म्हणाले होते. नितीश कुमार यांची ही विधाने म्हणजे ‘दबावाचे राजकारण’ म्हणून पाहिले गेले.

“जे रामाचे भक्त आहेत, फक्त त्यांनाच आमंत्रण” : श्रीराम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी ठाकरे-राऊतांना फटकारले

नितीशकुमार समन्वयक का होऊ शकतात?

नितीशकुमार यांना समन्वयक बनवण्याची अनेक कारणे आहेत. यात तर प्रथम त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र करण्याचे काम केले. गेल्या वर्षी नितीश कुमार यांनी देशातील विविध राज्यांचा दौरा करून विरोधी पक्षनेते/मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. नितीश यांनी भाजपविरोधात विरोधकांना एकत्र करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरे म्हणजे, नितीशकुमार यांच्याकडे इंडिया आघाडीचे शिल्पकार म्हणून पाहिले जात आहे. त्यांनी विरोधकांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची सूचना केली होती. जून 2023 मध्ये त्यांनी 15 पक्षांना एका व्यासपीठावर एकत्र आणले होते.

IIT BHU विद्यार्थीनीचा विनयभंग : अटक होताच तिन्ही आरोपींची भाजपमधून हकालपट्टी

नितीशकुमार नाराज झाले होते का?

दिल्लीत झालेल्या इंडिया अलायन्सच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे केले. याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर नितीश कुमार नाराज असल्याचे बोलले जात होते. कारण त्यांना ना समन्वयक बनवले गेले ना त्यांना पंतप्रधानांचा चेहरा घोषित करण्यात आले. मात्र, अनेक प्रसंगी नितीशकुमार यांनी आपल्याला कोणतेही पद नको असल्याचे सांगितले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज