“जे रामाचे भक्त आहेत, फक्त त्यांनाच आमंत्रण” : श्रीराम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी ठाकरे-राऊतांना फटकारले

“जे रामाचे भक्त आहेत, फक्त त्यांनाच आमंत्रण” : श्रीराम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी ठाकरे-राऊतांना फटकारले

अयोध्या : “जे रामाचे भक्त आहेत, फक्त त्यांनाच आमंत्रण दिले आहे” असे प्रत्युत्तर देत अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Acharya Satyendra Das) यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फटकारले. “मला अद्याप कोणतेही आमंत्रण आलेले नाही. पण मला तिथे येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही. केवळ राम मंदिराचा उद्घाटन सोहळा राजकीय इव्हेंट होऊ नये, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर दास यांनी प्रत्युत्तर दिले. (Acharya Satyendra Das, chief priest at Shri Ram Janmabhoomi Temple reaction to Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray)

आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, “जे प्रभू रामाचे भक्त आहेत त्यांनाच निमंत्रण दिले आहे. भाजप रामाच्या नावावर राजकारण करत आहे, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. आमच्या पंतप्रधानांचा सर्वत्र आदर केला जातो. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात खूप मोठी कामे केली आहेत, हे राजकारण नाही. ही त्यांची भक्ती आहे. संजय राऊत यांना खूप वेदना आहेत, ते वेदना व्यक्त करू शकत नाहीत म्हणून ते प्रभू रामाला यात ओढत आहेत. भाजपने श्रद्धा आणि विश्वासावर सत्ता मिळवली आहे. पण प्रभू रामांना राजकारणात आणून सत्ता मिळवली नाही. ज्यांनी प्रभू राम नाकारले त्यांचा पराभव झाला आणि ज्यांनी त्यांना स्वीकारले ते आज सत्तेत आहेत. अशीही टीका त्यांनी केली.

उद्धव ठाकरे, संजय राऊत काय म्हणाले होते?

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला जाणार का? असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, “मला अद्याप कोणतेही आमंत्रण आलेले नाही. पण मला तिथे येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही. कारण रामलल्ला सर्वांचा आहे. फक्त माझी एकच विनंती आहे की, राम मंदिराचा उद्घाटन सोहळा राजकीय इव्हेंट होऊ नये. कारण रामलल्ला कोणत्याी एका पक्षाची खासगी मालमत्ता नाही. कोट्यवधी रामभक्तांसाठी हा श्रद्धेचा विषय आहे”, असेही ते म्हणाले होते.

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर अन् CM योगींना बॉम्बने उडवणार; मेलद्वारे धमकी !

संजय राऊत म्हणाले, राम आमचा आहे, असे जर कोणी म्हणत असेल तर ते रामाला कमी लेखत आहेत. आमच्या पक्षाने रामासाठी बलिदान दिले आहे. आता भाजपचे सरकार अयोध्येतूनच चालेल असे वाटते. पीएमओ ते भाजप कार्यालय हे सर्व काही अयोध्येतूनच चालेल. 22 जानेवारीनंतर भाजप श्रीराम यांना पक्षाकडून उमेदवार करेल. संजय राऊत यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी भाजपच्या कार्यक्रमाला जाणार नाही, ही भाजपची रॅली आहे. या कार्यक्रमानंतर ते रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

Ram Mandir : …म्हणून श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 22 तारीख अन् ते 84 सेकंद महत्त्वाचे

इतरही नेत्यांचा अयोध्येला जाण्यास नकार :

दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे, “धर्म ही वैयक्तिक गोष्ट आहे, राजकीय फायद्यासाठी त्याचे साधन बनू नये” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिले. 23 डिसेंबर रोजी राम मंदिर निर्माण समितीचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांनी येचुरी यांची भेट घेत त्यांना उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही उद्घाटनाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज