रामनवमीच्या मुहूर्तावर रामभक्त अन् बिग बींच्या चाहत्यांना पर्वणी! अमिताभ बच्चन यांची थेट आयोध्येतून राम कथा

Amitabh Bachchan narrating Ramkath on Ram Navami from Ayodhya : रामभक्तांसाठी रविवारी 6 एप्रिलला मोठी पर्वणी असणार आहे. कारण त्यादिवशी प्रभु श्रीरामांचा जन्म दिवस राम नवमी आहे. त्या पार्श्वभूमीवरप्रभु श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येमध्ये खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी देखील आनंदाची बातमी समोर आली आहे.
अमिताभ बच्चन यांची थेट आयोध्येतून राम कथा
रामनवमीच्या दिवशी जिओ-हॉटस्टार प्रेक्षकांसाठी अयोध्यातून एक विशेष लाइव्ह स्ट्रीमिंग करणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन प्रभु श्रीरामांची प्रेरणादायी कथा सांगणार आहेत. तसेच राम जन्मभूमीवर होणाऱ्या सर्व विशेष धार्मिक कार्यक्रमांचं प्रसारण केलं जाणार आहे. 6 एप्रिलला सकाळी 8 वाजता पासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत स्ट्रीमिंग चालणार आहे.
चीनचा ट्रम्पला झटका; अमेरिकेच्या वस्तूंवर 34 टक्के ‘टॅरिफ’, अमेरिकेचे शेअर बाजार कोसळला
या स्ट्रीमिंग दरम्यान अमिताभ बच्चन रामाच्या मूल्यांवर चर्चा करतील. तसेच रामजन्म, रामायणाचे सात कांड आणि राम जन्मभूमीच्या कथा लाइव्ह स्ट्रीमिंग करणार आहे. तसेच अमिताभ बच्चन लहान मुलांसोबत एक इंटरॅक्टिव्ह सेशन देखील घेतील. ज्यामध्ये रामायणाचे निवडक कांडांतील काही कथा आणि दोहे दाखवले जाणार आहेत.
वैभवीच्या शिक्षणाचा खर्च एकनाथ शिंदे करणार, योगेश कदम यांची माहिती
या स्ट्रीमिंगमध्ये अयोध्येतील विशेष पूजेपासून मंदिरांतील पवित्र अनुष्ठान, भद्राचलम, पंचवटी, चित्रकूट आणि अयोध्येतील लाइव्ह आरतीचा आनंद घेता येणार आहेत. त्याचबरोबर भजन, कैलाश खेर आणि मालिनी अवस्थी यांच्यासह प्रसिध्द कलाकारांच्या मंत्रमुग्ध करणारी धार्मिक गाणी देखील ऐकता येणार आहे.
कर्मचाऱ्यांना दिलासा, आता PF चे पैसे सहज निघणार, ‘हे’ नियम बदलले
याबाबात बोलताना अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, या प्रोजेक्टचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी आभार मानले. ते म्हणाले की, या प्रोजेक्टचा भाग झाल्याचा अभिमान वाटतो. रामनवमी एका सणापेक्षा अधिक आहे. ही भगवान रामांनी सांगितलेल्या धर्म, भक्ती आणि धार्मिक आदर्श आमलात आणण्याचा क्षण आहे. ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रेक्षकांना हा आध्यात्मिक अनुभव मिळणार आहे.