KBC 17 वर राष्ट्रीय क्रीडा दिनाचा जल्लोष! महिला आइस हॉकी संघाचा अमिताभ बच्चन यांनी केला सन्मान

KBC 17 वर राष्ट्रीय क्रीडा दिनाचा जल्लोष! महिला आइस हॉकी संघाचा अमिताभ बच्चन यांनी केला सन्मान

Bachchan Honours Indian Womens ICE Hockey Team In KBC 17 : कौन बनेगा करोडपती सीझन 17 (KBC 17) सध्या प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे, जिथे प्रेरणादायी कथा आणि अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळत आहेत. अलीकडेच शोला त्याचा पहिला करोडपती आदित्य कुमार मिळाला असून, आता या शुक्रवारी येणारा भाग आणखी एका खास क्षणासाठी (Indian Womens ICE Hockey Team) सज्ज आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनच्या (National Sports Day) निमित्ताने प्रसारित होणाऱ्या या विशेष भागात भारतीय महिला आइस हॉकी संघाचा गौरव (Amitabh Bachchan) करण्यात येणार आहे. या संघाने नुकत्याच पार पडलेल्या IIHF आशिया चषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे.

जाधवर ग्रुपचा डंका! आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या 59 विद्यार्थ्यांची टीसीएसमध्ये निवड

या विशेष भागात संघाच्या सदस्य अमिताभ बच्चन यांच्यासोबत केबीसी सीझन 17 च्या मंचावर सहभागी होतील आणि त्यांनी कशा प्रकारे लडाखच्या बर्फाच्छादित प्रदेशात आव्हानांना सामोरे जात भारताचे नाव उज्वल केले, याची कहाणी शेअर करतील.

त्यांच्या या यशाने भारावून जाऊन अमिताभ बच्चन म्हणाले, लडाखसारख्या सुंदर पण कठीण परिसरात आइस हॉकीसारखा खेळ निवडणे सहज शक्य नसते. पण स्त्रिया काही ठरवलं की ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. तुम्ही सगळ्या चॅम्पियन बनून इथे आल्या आहात. हे आमच्यासाठी गर्वाचा क्षण आहे.

महायुतीत मिठाचा खडा! श्रीगोंद्यात अजितदादांच्या मेळाव्याआधीच आ. पाचपुते आक्रमक; जगताप-नागवडेंना घेरलं

हा खास भाग प्रेरणादायी कथा, महिला खेळाडूंची चिकाटी आणि भारताच्या क्रीडा आत्म्याचा गौरव करतो. हा भाग दाखवतो की महिला खेळाडू कशा प्रकारे अडथळ्यांवर मात करत नवीन यशोशिखरे गाठत आहेत आणि लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत. कौन बनेगा करोडपती सीझन 17, दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि Sony LIV वर प्रसारित केला जातो.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube