कर्मचाऱ्यांना दिलासा, आता PF चे पैसे सहज निघणार, ‘हे’ नियम बदलले

PF Money Withdrawal : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मोठा निर्णय घेत देशातील लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. ईपीएफओने (EPFO) ऑनलाइन पैसे काढण्याच्या काही नियमांमध्ये बदल केले आहे ज्या मुळे आता पीएफचे पैसे (PF Money Withdrawal) काढणे सोपे होणार आहे. ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, आता पैसे काढण्यासाठी तुम्हाला कंपनीने रद्द केलेला चेक आणि बँक (Bank) खाते व्हेरिफाय करण्याची आवश्यकता नाही. या निर्णयामुळे 8 कोटी सदस्यांचे दावे शक्य तितक्या लवकर निकाली लागणार असल्याचा दावा ईपीएफओने केला आहे.
ईपीएफओनुसार या बदलाचा फायदा कर्मचारी आणि मालक दोघांना होणार आहे. तर दुसरीकडे याबाबत कामगार मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की या नियमांमुळे दाव्याची प्रक्रिया सोपी होणार आहे आणि दावा नाकारल्यामुळे येणाऱ्या तक्रारी देखील कमी होतील. असं या निवेदनात माहिती देण्यात आली आहे. ईपीएफओनुसार, 7.74 कोटी सक्रिय ईपीएफ सदस्यांपैकी 4.83 कोटींनी त्यांचे बँक खाते यूएएनशी जोडले आहे. बँक खाते जोडण्यासाठी दररोज सुमारे 36000 रिवेस्ट प्राप्त होतात आणि या खात्यांची पताळणी करण्यासाठी बँकांना तीन दिवस लागतात आणि कंपनीच्या मंजुरीसाठी आणखी 13 दिवस लागले.
या नियमांमध्ये बदल
ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, आता सदस्यांना ऑनलाइन दावा दाखल करताना रद्द केलेल्या चेक किंवा पासबुकचा फोटो अपलोड करण्याची आवश्यकता नाही. बँक पडताळणीसाठी कंपनीची परवानगी आवश्यक राहणार नाही. याचा अर्थ बँक खात्याच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी कंपनीची परवानगी आता पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. ज्या ईपीएफ सदस्यांना त्यांचे पूर्वीचे लिंक केलेले बँक खाते बदलायचे आहे ते आता त्यांचा नवीन बँक खाते नंबर आणि आयएफएससी कोड टाकून ते करू शकतात. हे आधार आधारित ओटीपी पडताळणीद्वारे प्रमाणित केले जाईल.
काय फायदा होईल?
नियमांमधील बदलामुळे निकृष्ट दर्जाचे किंवा वाचण्यास कठीण असलेले दस्तऐवज अपलोड करण्यामुळे होणारा विलंब दूर होईल. पूर्वी, या कारणांमुळे दावे नाकारले जात असत. या बदलांचा लाखो सदस्यांना फायदा होईल. 28 मे 2024 रोजी काही केवायसी अपडेट केलेल्या सदस्यांसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून हा बदल सुरू करण्यात आला. 1.7 कोटी ईपीएफ सदस्यांना याचा फायदा झाला आहे. त्याचे यश पाहून, ईपीएफओने आता ही सूट सर्व सदस्यांना दिली आहे.
अन्न नाही, पाणी नाही…., तुर्की विमानतळावर 30 तास अडकले भारतीय; व्हिडिओ व्हायरल
कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही
कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की बँक खाते UAN शी लिंक करताना, ते EPF सदस्यांच्या तपशीलांसह व्हेरिफाय केले जाते. त्यामुळे या अतिरिक्त कागदपत्रांची आता आवश्यकता नाही. या निर्णयाचा तात्काळ 14.95 लाखांहून अधिक ईपीएफ सदस्यांना फायदा होईल. त्याच्या बँक पडताळणीसाठी कंपनीची मान्यता प्रलंबित होती, त्यामुळे आता त्याला पैसे लवकर मिळतील.