कर्मचाऱ्यांना सरकारचं गिफ्ट! ईपीएफओच्या बैठकीत होणार पीएफच्या व्याज वाढीचा निर्णय
![कर्मचाऱ्यांना सरकारचं गिफ्ट! ईपीएफओच्या बैठकीत होणार पीएफच्या व्याज वाढीचा निर्णय कर्मचाऱ्यांना सरकारचं गिफ्ट! ईपीएफओच्या बैठकीत होणार पीएफच्या व्याज वाढीचा निर्णय](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2024/12/epfo_V_jpg--1280x720-4g.webp)
EPFO Will Increase PF Intrest : 2025 च्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने मध्यमवर्गीयांना दिलासा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा नोकरदार वर्ग म्हणजेच पुन्हा एकदा मध्यमवर्गीयांना सरकार आणखी एक गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. कारण नुकतीच ईपीएफओ बोर्डाची बैठक होणार आहे. त्यामध्ये नोकरदारांच्या भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफच्या व्याजामध्ये वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.
हर्षित राणासाठी ड्रीम डेब्यू, पहिल्याच सामन्यात आपल्या नावावर केला अनोखा ‘विक्रम’!
28 फेब्रुवारीला पीएफओ बोर्डाची बैठक होणार आहे. त्यामध्ये नोकरदारांच्या भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफच्या व्याजामध्ये वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीच्या अध्यक्षपदी केंद्रिय कामगार कल्याण मंत्री असणार आहेत. तसेच त्यामध्ये कर्मचारी आणि व्यापार संघटनांचे प्रतिनिधी देखील असणार आहेत. मात्र अद्याप या बैठकीचा अजेंडा ठरलेला नाही.
करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंना दणदणीत झटका… नक्की मॅटर काय आहे?
दरम्यान गेल्या वेळी 2023-24 मध्ये देखील या व्याजात वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा ही वाढ होणार आहे. या अगोदर वाढ केली तेव्हा हे व्याजदर 8.15 टक्के होते त्यानंतर आता 0.10 टक्के होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही वाढ करण्याचे कारण म्हणजे सध्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारला मागणी आणि खप वाढणं गरजेचं आहे. त्यामुळे अगोदर करामध्ये सवलत त्यानंतर आता मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांच्या व्याजदरामध्ये वाढ होणार आहे. जेणेकरून ते बचत वाढल्यानंतर जास्तीत जास्त खर्च करतील आहे बाजारामध्ये मागणी आणि खप वाढेल.
आमच्या 7 आमदारांना 15 कोटींची ऑफर, बड्या नेत्याचा भाजपवर खळबळजनक आरोप
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचा सलग आठवा अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केलाय. यामध्ये मध्यमवर्गीयांना पुरेसा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा उद्देश सामान्य माणसाची बचत वाढवणे हा आहे, जेणेकरून खप वाढवून सुस्त अर्थव्यवस्थेचा वेग वाढवता येईल. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सुधारित कर स्लॅबही (Income Tax 2025) जाहीर केला.