Akshay Kumar Films: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमारसाठी (Akshay Kumar) आजकाल काही खास घडत नाहीये. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) काहीच कमाल दाखवत नाहीत. त्याचे मागील चित्रपट सतत फ्लॉप होत आहेत. त्यामुळे खिलाडीचा चांगला चित्रपट कधी पाहायला मिळणार याकडे चाहत्यांनाही चिंता लागून राहिली आहे. एकीकडे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत असताना दुसरीकडे अक्षयला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ‘वेलकम टू जंगल’ आणि ‘हाऊसफुल 5’ या (Housefull 5) त्याच्या चित्रपटांपासून दोन मोठ्या स्टार्सनी स्वतः सिनेमातून माघार घेतली आहे.
अक्षयने गेल्या वर्षी त्याच्या दोन्ही चित्रपटांची घोषणा केली होती आणि आता संजय दत्त आणि अनिल कपूर यांनी सिनेमातून माघार घेतली आहे. अक्षय कुमारच्या ‘वेलकम फ्रँचायझी वेलकम टू द जंगलची घोषणा अभिनेत्याने गेल्या वर्षी केली होती. चित्रपटाची स्टारकास्टही खूप मोठी आहे. अक्षयने स्टार कास्टसोबत एक टीझरही शेअर केला आहे. संजय दत्तने (Sanjay Dutt) आता हा चित्रपट सोडला आहे. अनिल कपूर (Anil Kapoor) ‘हाऊसफुल 5’ मधून बाहेर पडला आहे.
संजय दत्तने शूटिंग सुरू केले होते
‘वेलकम टू द जंगल’मध्ये संजय दत्त दिसणार होता. त्याने या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली होती. अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती की, त्याने संजय दत्तसोबत शूटिंग सुरू केले आहे. बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, संजय दत्तने डेट इश्यूमुळे हा चित्रपट सोडला आहे. चित्रपट सोडण्यापूर्वी त्याने अक्षयला सर्व काही सांगितले होते आणि त्यानंतर त्याने स्वत: माघार घेतली आहे. अनियोजित शूट आणि स्क्रिप्टमधील अनेक बदलांमुळे संजय दत्तनेही चित्रपट सोडला आहे.
Box Office: राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’च्या कमाईत मोठी घट, कमावले फक्त ‘इतके’ कोटी
कमी फीमुळे अनिल कपूर निघून गेला
अक्षय कुमारचा हाऊसफुल फ्रँचायझी सुपरहिट ठरला आहे. आता तो ‘हाऊसफुल 5’ घेऊन येत आहे. अनिल कपूर (Anil Kapoor) या चित्रपटात विशेष भूमिका साकारणार होते, मात्र कामानुसार फी न मिळाल्याने त्यांनी ते सोडले. मिड डेच्या वृत्तानुसार, अनिल कपूरला जेवढे फी मिळायला हवे होते तेवढे मिळत नव्हते. मात्र, या चित्रपटासाठी त्याने किती फी मागितली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.