Download App

Sanjay Dutt Injured: ‘केडी-द डेव्हिल’च्या शूटिंगदरम्यान संजय दत्तला गंभीर दुखापत, हात-चेहऱ्यावर जखम

Sanjay Dutt Injured: बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त चित्रपटसृष्टीत त्याच्या दमदार (Sanjay Dutt Injured) अभिनयासाठी ओळखला जातो. अशातच संजय दत्तबाबत (Sanjay Dutt) एक मोठी बातमी समोर आली आहे. शूटिंगच्या दरम्यान संजय दत्तला गंभीर दुखापत झाली आहे.

संजय सध्या त्याच्या आगामी ‘केडी – द डेव्हिल’ (KD-The Devil) या कन्नड चित्रपटाचे शूटिंग बेंगळुरूच्या आसपासच्या भागात करत आहे. (Sanjay Dutt Injured) या चित्रपटामध्ये बॉम्बस्फोटाच्या सीक्वेन्सचे शूटिंग सुरू होते. या बॉम्बस्फोटाचे शूटिंग करताना संजय दत्तला गंभीर दुखापत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, संजयच्या हात आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. या घटनेमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. संजय दत्तला फाईट मास्टर डॉ. रवि वर्मा यांच्या ‘केडी: द डेव्हिल’ या चित्रपटासाठी फाईट कम्पोज करत होता. या दरम्यान त्यांचा अपघात झाला. या बातमीनंतर चाहते मोठ्या प्रमाणात चिंतेत पडले आहेत. तो लवकर बरं व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

खलनायकाच्या भूमिकेत दिसणार
‘KGF Chapter 1’ आणि ‘KGF Chapter 2’ नंतर संजय दत्त पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे. कन्नड चित्रपट ‘केडी: द डेव्हिल’मध्ये संजय दत्त अॅक्शन हिरो ध्रुव सरजा यांच्या बरोबर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच ध्रुव सरजा यांच्या ‘मार्टिन’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे, जो चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडला होता.

Tags

follow us