Download App

Shanaya Kapoor : संजय कपूरच्या मुलीची साऊथ सुपस्टार मोहनलालसोबत धडाकेबाज एन्ट्री! ‘या’ चित्रपटात दिसणार

Shanaya Kapoor : सोनम कपूर (Sonam Kapoor) जान्हवी कपूर (Janhvi Kpoor) यांच्यानंतर आता कपूर घराण्यातील आणखी एक मुलगी बॉलिवूड डेब्यू करणार आहे. ती कपूर घरातील मुलगी म्हणजे एकेकाळी रोमांन्स आणि अॅक्शनने तरूणींचे मन जिंकणारा अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor). ती आता धर्मा प्रोडक्शनच्या मोठ्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (Sanjay Kapoor’s daughter Shanaya Kapoor Bollywood debut with south superstar Mohanlal )

Shahajibapu Patil : अजित पवार मविआत निराशेतून उपमुख्यमंत्री, आता ते युतीत आल्यानं मी आनंदी

शनाया पदार्पण करणार असलेल्या चित्रपटाचं नाव वृषभा असं आहे. तर ती यामध्ये साऊथ सुपस्टार मोहनलालसोबत बॉलिवूडमध्ये धडाकेबाज एन्ट्री करणार आहे. त्यामुळे तीच नशीबच उजणार आहे. असं म्हटल तरी वावगं ठरणार नाही. तिला पदार्पणातच थेट मोठ्या अभिनेत्यासोबत काम करायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात जहरा खानही असणार आहे. जी सलमा आगा यांची मुलगी आहे. तर चित्रपटाचे नायक हे रोशन मेका असणार आहेत.

Nitin Gadkari धमकी प्रकरणात मुख्य सुत्रधार दहशतवादी नागपूर पोलिसांच्या ताब्यात…

ही चित्रपट दाक्षिणात्य असला तरी पॅन इंडिया असल्याने तो तेलुगु आणि मल्याळमसह हिंदी, तमिळ आणि कन्नड़ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन खआली बनणाऱ्या चित्रपटात काम करण्याची अनेकांची इच्छा असते. तर शनाया बद्दल सांगायचे झाले तर ती पुर्ण तयारीने हे पदार्पण करणार आहे. तिच्या येण्याआधीच तिच्या प्रचंड चर्चा आहेत. ती सोशल मिडीयासह डान्ससाठी देखील ओळखली जाते.

दरम्यान तिच्या या पदार्पणाबद्दल निर्माती एकता कपूर उत्सुक असल्याचं पाहायला मिळालं. एकताने शनायाबद्दल पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये एकता म्हणते की, खुप वर्षांपासून संजय कपूरसोबत काम करण्याची इच्छा होती. आता त्यांची मुलगी शनाया तिचं चित्रपटांतील पदार्पण करत आहे. ती साऊथ सुपस्टार मोहनलालसोबत वृषभा या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे. असं देखील एकताने सांगितलं.

Tags

follow us