Download App

जितेंद्र जोशी तुम्ही कमाल केली! संकर्षणची भावूक पोस्ट, नाटक धर्माला जागणारी वृत्ती…

Sankarshan Karhade Post For Jitendra Joshi : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने (Sankarshan Karhade) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांच्यासोबतचा हा अनुभव त्याने आपल्या शब्दांत मांडला आहे. खरं तर संकर्षणने जितेंद्र जोशींचे आभार मानण्यासाठी ही पोस्ट केली आहे.

संकर्षण त्याच्या पोस्टमध्ये म्हणतोय की, जितेंद्र जोशी यांचे आभार मानायला शब्द नाहीत. नाटकापूर्वी रंगमंदिरामध्ये अनाऊन्समेंट वाजते. ती नाटकासाठी अत्यंत महत्वाची असते. कुटुंब किर्तन नावाच्या नाटकाची अनाऊन्समेंटो कोणी करावी? असं सुरू असताना मनात जितेंद्र जोशी यांचं नाव आलं. मी ते दामले सरांच्या कानावर घातलं. ते देखील एका क्षणात डन् म्हटले.

औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलं! सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रत्येकाची आस्था…

त्यानंतर सकाळी अकरा वाजता मी जितेंद्र जोशींना फोन केला, विचारलं दादा करशील का रे? आम्ही कधीच एकत्र काम केलं नाही. भेटून शेकहॅंड सुद्धा आमचा कधी झाला नाहीये. परंतु पलीकडून उत्तर आलं, ‘मित्रा करीन की रे…’ मी विचारलं कधी वेळ मिळेल तुला, यावर जोशींनी उत्तर दिलं…आजच देतो.

लिहिलेली अनाऊन्समेंट पाठवली. त्यात मोलाची भर घालून जोशी बूवांनी जी काही रंगत आणलीये, ती तुम्हाला नाटकाच्या आधी ऐकायला मिळेल. संकर्षणने फोन ठेवताना विचारलं आभार कसे मानू? जोशी म्हणाले मानूच नको. कधीतरी तुला पुढचा संकर्षण फोन करेल. त्याला अशीच साथ दे. यावर संकर्षण म्हणतो मी निशब्द झालो. काय बोलायचं? नाटक धर्माला जागणारी ही वृत्ती शिकवून येत नाही.

फडणवीसही औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, दोघांचाही कारभार एकसारखा…हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

संकर्षण म्हणतो, मला खूपदा लोक विचारतात तु मुंबईचा नाही. तुला लोकांनी कधी दूजाभाव करून वागवलं का? याचं उत्तर मला या शहराने, माझ्या कामाने अशी माणसं दिली जी एका भेटीमध्ये एक चारशे पानांचं पुस्तक वाचल्याचा आनंद देतात, असं आहे. मी हे कधीच विसरणार नाही. जितेंद्र जोशी तुम्ही कमाल केली, असं देखील पोस्टच्या शेवटी संकर्षण म्हटला आहे.

 

follow us