Download App

Sanskriti Balgude: संस्कृतीने केली नव्या प्रोजेक्टला सुरुवात; ‘या’ सिनेमातून करणार इंडस्ट्रीत एन्ट्री

Sanskriti Balgude: आपल्या अभिनयानं आणि निखळ सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे

Sanskriti Balgude: आपल्या अभिनयानं आणि निखळ सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे (Sanskriti Balgude). छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ मालिकेतील आनंदी भूमिकेमुळे संस्कृती घराघरांत पोहचली. अभिनय सोडून अनेक गोष्टींमध्ये संस्कृती निपूण आहे. संस्कृती सध्या सोशल मीडियावर (social media) चर्चेत आहे. आता तिच्या सोशल मीडिया स्टोरी मधून नव्या शूटची गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.


अभिनेत्री संस्कृती हा प्रोजेक्ट गोव्यात शूट करतेय अस कळतंय पण हा प्रोजेक्ट नक्की काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संस्कृती लवकरच बॉलिवूड (Bollywood) प्रोजेक्टमध्ये सुद्धा दिसणार असून येणाऱ्या काळात ती अनेक नवनवीन गोष्टी घेऊन येणार आहे यात शंका नाही. आता तिने थेट ‘करेज’ या बॉलिवूड सिनेमात ती झळकणार असल्याचं सांगितलं जात आहे.

नुकतचं ‘करेज’ या सिनेमाची Wrap Up जोरदार पार्टी झाली. या पार्टीमध्ये संस्कृती दिसून आली. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच अभिनेता शारीब हाश्मी याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Spruha Joshi: मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आयुष्यात कोण आहे शक्तिमान? जाणून घ्या ते कोण?

दरम्यान, संस्कृतीने तिच्या या आगामी प्रोजेक्टबद्दल अद्याप तरी चाहत्यांना फारशी माहिती दिली नाही. त्यामुळे तिच्याया नव्या भूमिकेविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या सिनेमात ती नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. संस्कृती ‘काळे धंदे’ या वेबसीरिजमध्येही झळकली होती.

follow us