बिग बीं शेअर केला ‘अश्वत्थामा’चा दमदार लूक; सोशल मीडियावर ‘कल्की 2898 एडी’ची चर्चा

बिग बीं शेअर केला ‘अश्वत्थामा’चा दमदार लूक; सोशल मीडियावर ‘कल्की 2898 एडी’ची चर्चा

Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD: यावर्षीचा सर्वात मोठा चित्रपट कल्की 2898 AD ची (Kalki 2898 AD) खूपच जोरदार चर्चा होत आहे. एकापाठोपाठ एक स्टार कास्टचा फर्स्ट लूक समोर येत असून आता या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लूक समोर आला आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी याबाबतचा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)


‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात प्रभास (Prabhas) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, तर अमिताभ बच्चन यांची खास भूमिका आहे. हा चित्रपट एक मेगाबजेट चित्रपट आहे, जो या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सध्या अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील लूकची बरीच चर्चा रंगत आहे.

‘कल्की 2898 एडी’मधील अमिताभ बच्चन यांचा लूक रिलीज

अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हे शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, ‘हा असा अनुभव आहे जो मला याआधी कधीच आला नव्हता.’ या चित्रात अमिताभ बच्चन यांचा असा लूक समोर आला आहे जो एकदम वेगळा आणि खतरनाक आहे. त्याचा हा लूक अश्वथामाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे पोस्टर खूपच दमदार आहे. अमिताभ बच्चन दाढी वाढवलेल्या लूकमध्ये असून त्यांचा हा लूक पाहून अनेकांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे. 21 एप्रिलच्या संध्याकाळी चित्रपटाशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे आणि चाहत्यांना हे पोस्टर खूप आवडले आहे. अमिताभ बच्चन यांच्यासाठीही हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यात त्यांचे काम वेगळे असेल आणि हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट ठरू शकणार आहे.

‘कल्की 2898 एडी’ चा टीझर

अमिताभ बच्चन यांनी ‘कल्क 2898 एडी’ चा एक छोटा टीझरही शेअर केला आहे. यामध्ये त्याचा अश्वथामा लूक दिसला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रेक्षकांना हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अमिताभ बच्चन यांच्या अंगावर पांढरे कापड पूर्णपणे बांधलेले आहे. फक्त त्याचे डोळे उघडे आहेत आणि ते शिवलिंगाची पूजा करत आहे. तेवढ्यात एक मुलगा त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो, ‘हाय…मी राया आहे.’ ‘यानंतर तो अश्वथामाची भूमिका करणाऱ्या अमिताभ बच्चनला त्रास देतो. अश्वथामाच्या कपाळातून रक्त येते आणि मूल म्हणतो, ‘तू देव आहेस?’ अमिताभ म्हणतात की, ‘आता वेळ आली आहे, माझ्या शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे.’

Sanskriti Balgude चं बॉलिवुडमध्ये पदार्पण; प्रोजेक्टच नावही आलं समोर!

‘कल्की 2898 एडी’ कधी रिलीज होणार?

नाग अश्विन दिग्दर्शित कल्की 2898 एडी या चित्रपटाची रिलीज डेट 9 मे आहे. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकांमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलली जाऊ शकते. मात्र, याबाबत निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट जवळपास 600 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटात प्रभास आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube