Sanskriti Balgude चं बॉलिवुडमध्ये पदार्पण; प्रोजेक्टच नावही आलं समोर!

Sanskriti Balgude नव्या चित्रपटाच्या तयारीत? नव्या हेअर कटने वेधले लक्ष

Sanskriti Balgude Bollywood Debut Project name reveal : अनेक दिवसांपासून संस्कृती बालगुडे ( Sanskriti Balgude ) बॉलिवुडमध्ये काम करणार ( Bollywood Debut ) असल्याचा चर्चा होत असताना नुकताच तिने सोशल मीडियावर तिच्या बॉलिवुड प्रोजेक्टबद्दल मोठा अपडेट दिली आहे. करेज ( Courage ) अस या बॉलिवुड प्रोजेक्टच नाव असून याची रॅप अप पार्टी नुकतीच पार पडली.

कोल्हापूरात मविआची ताकद वाढली! एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा

संस्कृती कायम तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकासाठी ओळखली जाते आणि आता तिचा हा बॉलिवुड प्रोजेक्ट काय असणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता आहे. करेज मध्ये संस्कृती शारीब हाश्मी सोबत दिसणार आहे. शारीब हाश्मी ने बॉलिवुड मध्ये स्वतःची वेगळी ओळख संपादन केली असून कायम तो त्याचा भूमिकांसाठी चर्चेत असतो आता संस्कृती आणि शारीब हाश्मी ही जोडी नक्की काय घेऊन येणार आहे अजून गुलदस्त्यात आहे.

मुलाच्या नावावरून ट्रोल, महाराजांची भूमिका न करण्याचा चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय!

संस्कृती फॅशन आणि तिच्या लाईफस्टाईल आणि अनेक गोष्टी मुळे सोशल मीडिया वर चर्चेत तर असते पण तिने मागच्या काही दिवसात सोशल मीडिया वरून ब्रेक घेऊन ती लेह लडाख मध्ये जाऊन विस्पशना देखील करून आली आहे. अभिनय, कला, फॅशन अश्या संस्कृतीच्या अनेक बाजू सगळ्यांनी आजवर अनुभवल्या आहेत आता संस्कृतीच बॉलिवुड पदार्पण बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. येणाऱ्या काळात संस्कृती प्रेक्षकांना अजून वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे यात शंका नाही.

follow us