Sanskriti Balgude: ‘या’ कारणासाठी सोशल मीडियावरनं गायब आहे संस्कृती, चाहत्यांनी केली कारणांची यादी

Sanskriti Balgude: ‘या’ कारणासाठी सोशल मीडियावरनं गायब आहे संस्कृती, चाहत्यांनी केली कारणांची यादी

Sanskriti Balgude: छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ (Pinjra) या मालिकेतून घरांघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे (Sanskriti Balgude). छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही संस्कृतीने आपल्या (Instagram ) अभिनयाचा जलवा दाखवला आहे. अभिनय सोडून चित्रकला, फॅशन, भरतनाट्यम, या गोष्टींमध्यही संस्कृती अव्वल आहे. आता अभिनयाच्या पलिकडे जाऊन ही अभिनेत्री एक कलाकार सुद्धा आहे हे तिच्या सोशल मीडियावरून (Social Media) कळून येत मग ते नृत्य असो किंवा चित्रकला संस्कृती कायम स्वतःचे छंद जोपासताना दिसते.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे गेल्या काही दिवसांपासून संस्कृतीने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता आणि आता नुकतीच ती सोशल मीडियावर पुन्हा आली आहे. आता तिने हा सोशल मीडिया ब्रेक का ? घेतला होता असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. संस्कृती ने सोशल मीडियावर कम बॅक केलं ते थेट लेह लडाकच्या स्टोरी मधून आता ती तिकडे शूटसाठी गेली होती की कामासाठी हे अजून स्पष्ट झालं नाही.

Salman Khan च्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी तीन जण ताब्यात; तपास क्राईम ब्रॅंच करणार

तिचे अनेक व्हिडीओ, फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. हल्ली अनेक कलाकार स्वतःच्या धावपळीच्या जगातून ब्रेक घेण्यासाठी सोशल डिटॉक्सवर जातात पण संस्कृती ही कायम सोशल मीडियावर अॅक्टिव असलेली अभिनेत्री अशी अचानक का गायब झाली असावी, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. संस्कृती स्वतः हा याबद्दल काही सांगणार का? नवीन प्रोजेक्ट्सबद्दल काही बोलणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

संस्कृती आता लवकरच एका बॉलिवुड प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. बॉलिवुड अभिनेता शारिब हाश्मी सोबत ती या हिंदी- इंग्रजी प्रोजेक्ट मध्ये पाहायला मिळणार आहे. हा बॉलिवुड प्रोजेक्ट नक्की काय असणार आहे कोणा सोबत असणार आहे या बद्दल काही समजलं नसल तरी लवकरच या बद्दल ती अधिकृत माहिती देणार असल्याचं कळतंय. संस्कृती बालगुडे ही कायम फॅशन , नृत्य आणि तिच्या अभिनयासाठी चर्चेत असते आणि आता ती बॉलिवुड मध्ये सुद्धा पदार्पण करणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube