पहिल्या सहामाहीत Instagram ने केली बंपर कमाई, मेटाच्या कमाईत किती टक्के वाटा?

पहिल्या सहामाहीत Instagram ने केली बंपर कमाई, मेटाच्या कमाईत किती टक्के वाटा?

Instagram Revenue : कोरोना काळापासून देशात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आपल्या देशात Whatsapp, Facebook नंतर आता Instagram ची देखील खूपच लोकप्रियता वाढली आहे. आज अनेक यूजर्स Instagram चा वापर रील्स बनवण्यासाठी आणि फोटो शेअरिंगसाठी करताना दिसत आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? गेल्या काही वर्षात Instagram ने किती कमाई केली आहे. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका खटल्यानुसार गेल्या काही वर्षात Instagram च्या कमाईमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

फेडरल ट्रेड कमिशनच्या एका रिपोर्ट्सनुसार, Instagram ने 2022 च्या पहिल्या सहामाहीत मेटा प्लॅटफॉर्म्स इंकच्या एकूण कमाईच्या जवळपास 30% कमाई केली आहे. तर 2020 मध्ये Instagram ने $22 बिलियनची कमाई केली होती. 2020 मध्ये ही कमाई मेटाच्या एकूण 26 टक्के इतकी होती. तर 2021 मध्ये इंस्टाग्रामची कमाई $32.4 बिलियनवर पोहोचली म्हणजेच 2021 मध्ये इंस्टाग्रामने मेटाच्या एकूण कमाईच्या 27 टक्के व्यवसाय केला होता. तर 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांत Instagram ने तब्बल $16.5 बिलियनची कमाई केली .

फेडरल ट्रेड कमिशनच्या रिपोर्टनुसार मेटाच्या इतर सोशल नेटवर्किंग ॲपपेक्षा Instagram ची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. मात्र यावर कंपनीच्या प्रवक्त्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी 2012 मध्ये Instagram $715 दशलक्षमध्ये खरेदी केले होते.

तर शुक्रवारी मेटाने खटल्यापूर्वी एफटीसीचा खटला फेटाळण्यास न्यायाधीशांना सांगितले, या एजन्सीने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या अधिग्रहणामुळे ग्राहकांचे नुकसान झाल्याचे सिद्ध केले नाही. म्हणून हा खटला न्यायालयाने फेटाळावे अशी मागणी मेटाने केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज