मुलाच्या नावावरून ट्रोल, महाराजांची भूमिका न करण्याचा चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय!

मुलाच्या नावावरून ट्रोल, महाराजांची भूमिका न करण्याचा चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय!

Chinmay Mandlekar Decision not play role Chhatrapati Shivaji Maharaj : चिन्मय मांडलेकर ( Chinmay Mandlekar ) हा अभिनेता मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आणि नेक ऐतिहासिक भूमिकांमुळे नावारुपास आलेला अभिनेता आहे. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायर बातमी समोर आली आहे. कारण आता चिन्मयने आपण यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची ( Chhatrapati Shivaji Maharaj ) भूमिका साकारणार नसल्याचं ( role ) एक व्हिडीओ पोस्ट करत जाहीर केलं आहे.

काय आहे नेमंक प्रकरण ?

चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर एका वेगळ्याचा कारणाने ट्रोल होत आहेत. ट्रोलर्सच्या टीकेचा त्यांना सामना करावा लागत आहे. या प्रकाराला कारण ठरलंय त्यांच्या मुलाचं नाव. चिन्मय मांडलेकरने एका मुलाखतीत त्याच्या मुलाचं नाव जाहीर केलं होतं. यावरून त्याच्या पत्नीला सोशल मीडियात प्रचंड ट्रोल करण्यात आलं. या ट्रोल्सला आता चिन्मयची पत्नी नेहाने सडेतोड उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे, मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं या प्रश्नाचं उत्तरही तिनं दिलं आहे. जहांगीर या शब्दाचा अर्थ जगज्जेता असल्याचं तिनं आपल्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

कॉंग्रेस जिहादींना पाठीशी घालतेय, मोदींना पाडण्यासाठी मशिदीतून फतवे…; राम सातपुतेंचा आरोप

त्यानंतर या ट्रोलिंगला वैतागलेल्या चिन्मयने अखेर आपण यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत जाहीर केलं आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला आहे की, शनिवारी माझी पत्नी नेहाने इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ जहांगीर नाव असल्याने आमच्या मुलावरून आम्हाला ट्रोल केलं जात आहे त्याविषयी होता. हा व्हिडिओ पोस्ट करून देखील आमचे ट्रोलिंग सुरूच आहे.

राहुल गांधींची तब्बेत अचानक बिघडली; MP दौरा रद्द, रांचीलाही रॅलीसाठी जाणार नाही

ज्यामध्ये वडिलांचे पितृत्व ते आईच्या चारित्र्यावर देखील अनेकांनी शिंतोडे आहेत. याचा आम्हाला त्रास होतोय. मी एक अभिनेता आहे. मात्र सोशल मीडियावरून अशाप्रकारे होणारा माझ्या कुटुंबाला त्रास यासाठी मी बांधील नाही. माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता त्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण माझ्या वैयक्तिक आयुष्यभर बोलण्याचा हक्क तुम्हाला नाही. तसेच माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं? याबद्दल मी अनेक ठिकाणी स्पष्टीकरण दिला आहे.

वंचितला धक्का! आंबेडकरांचे आदेश धुडकावत जिल्हाध्यक्ष महाविकास आघाडीसोबत

तसेच मी आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे. तरी देखील मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं? असं ट्रोल करणार्‍यांचं म्हणणं आहे. तसेच माझ्या मुलाचा जन्म 2013 साली झाला. तो आता अकरा वर्षांचा आहे. त्यावेळी असं कुठल्याही प्रकारचे ट्रोलिंग झालं नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे मला प्रचंड प्रेम मिळालं. मात्र त्या भूमिकेचा माझ्या कुटुंबाला त्रास होत असेल. तर मी नम्रपणे सांगतो की इथून पुढे मी ही भूमिका करणार नाही. त्याचं मला अत्यंत वाईट वाटत आहे. कारण महाराजांबाबत माझ्या मनात प्रचंड श्रद्धा आहे. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील त्यांच्याबाबत तेवढीच श्रद्धा बाळगतो. पण त्या श्रद्धेच स्पष्टीकरण देणे मला गरजेचं वाटत नाही.

तसेच ज्या लोकांना माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे. हे खटकतय ते जहांगीर आर्ट गॅलरीच नाव बदलणार का? जहांगीर नाव असलेल्या एका व्यक्तीला भारत सरकारने भारतरत्न दिला ती व्यक्ती म्हणजे जहांगीर रतनजी टाटा. त्यांच्या देशभरातील अनेक उद्योगांचा लाभ देशातील प्रत्येकाला असतो. तसेच त्यांच्या एअर इंडिया एअरलाइन्समध्ये आपण अभिमानाने बसतो. असा सवाल देखील त्यानो उपस्थिमत केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube